Homeताज्या बातम्यादेश

आमदार अपात्रतेचा लवकर फैसला करावा

सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅड. सिब्बल यांची मागणी

नवी दिल्ली ः शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असून, निवडणूक आयोगाने त्यामुळेच त्यांना चिन्ह आणि नाव दिले असे सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांन

कोविडच्या नव्या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात : ना. शंभूराज देसाई
चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटकांसाठी बंद
अपघातमुक्त सेवा देणार्‍या 42 बस चालकांना सुरक्षा पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली ः शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असून, निवडणूक आयोगाने त्यामुळेच त्यांना चिन्ह आणि नाव दिले असे सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तोच निर्णय कायम ठेवला. एकाही आमदाराला म्हणजेच शिंदे गट किंवा ठाकरे गट यापैकी कुठल्याही आमदाराला अपात्र न ठरवता शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरूवारी सुनावणी घेण्यात आली.
कपिल सिब्बल हे ठाकरे गटाच्या बाजूने तर हरिश साळवे शिंदे गटाकडून युक्तिवाद करत आहेत. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे लवकर सुनावणी घ्यावी नाहीतर प्रकरण निरस्त ठरेल. उद्धव ठाकरेंकडेच पक्ष होता हे स्पष्ट आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यानंतर हरिश साळवेंनी युक्तिवाद केला. ठाकरे गटाने जे दस्तावेज सादर केले ते खोटे आहेत. उद्धव ठाकरेंनी नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव कुणी मांडला ते बघा. त्यापैकी अनेकांचे म्हणणे आहे की ते स्वतः हजर नव्हतेच. कायद्याचा प्रश्‍न नंतर आहे. राठोड, सावंत यांनी काय साक्षी नोंदवल्यात त्या पाहाव्यात. त्यानंतर हरिश साळवेंनी आमदारांचे ठराव दाखवले. ठाकरेंचा प्रस्ताव ज्यांनी सादर केले त्यापैकी अनेकजण बैठकीला उपस्थित नव्हते असे हरिश साळवे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या बरोबर किती आमदार होते यासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे विश्‍वासार्ह नाहीत असेही साळवे म्हणाले.

COMMENTS