नाशिक : महावितरणच्या सर्व ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले जनमित्र महावितरण आणि ग्राहक यामधील थेट दुवा
नाशिक : महावितरणच्या सर्व ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले जनमित्र महावितरण आणि ग्राहक यामधील थेट दुवा असून, देशात मागील वर्षांपासून लाईनमन दिवस साजरा होत असून, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करीत असून, जनमित्र यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व अखंडित सेवेचा हा संन्मान असल्याचे प्रतिपादन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले, ते ०४ मार्च २०२४ रोजी लाईनमनदिनी कुलथे हॉल, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित नाशिक शहर विभाग १ व २ मधील जनमित्रांच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे होते तर कार्यक्रमाला व्यासपीठावर अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सहाय्यक महाव्यस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता योगेश निकम व प्रमोद पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले उपस्थित होते. जनमित्र ग्राहकांना उत्तम सेवा देत असून ग्राहकांच्या गरजा तसेच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी असेच जनमित्रांनी कार्यरत राहावे असे आवाहन अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात तंत्रज्ञ अन्वर तडवी व अतुल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी उपस्थित तंत्रज्ञाना विद्युत सुरक्षेची शपथ दिली. यावेळी सेवा देताना निधन झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मौन पाळून सामूहिक श्रद्धाजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. अश्विन राजे यांनी ताणतणाव व्यवस्थापन यासंदर्भात तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्रकुमार राठौर यांनी विद्युत सुरक्षितता संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण सोनवणे यांनी, सूत्रसंचालन समीर वडजे व आभार प्रदर्शन अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र भांबर यांनी केले कार्यक्रमाला अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासोबतच नाशिक परिमंडळातील सर्वच विभागीय व उपविभागीय कार्यालयांमध्ये लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. लाईनमन दिवसानिमित्त विद्युत भवन येथून विद्युत सुरक्षा व वीज बचत याची माहिती देणारे फलक घेऊन जनमित्र यांनी मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीला मुख्य अभियंता यांनी हिरवी झेंडी दाखविली.
COMMENTS