Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार गटाकडून धमक्यांचा आरोप

हर्षवर्धन पाटलांचे थेट शिंदे-फडणवीसांना पत्र

पुणे ः इंदापुरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येतांना दिसून येत आहे. कारण भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन

सत्ता-संघर्षाच्या निकालाआधीच घडामोडींना वेग
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल 
मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार

पुणे ः इंदापुरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येतांना दिसून येत आहे. कारण भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँगे्रसवर गंभीर आरोप करतांना जीवाला धोका असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघानंतर इंदापुरात देखील महायुतीमधील नेत्यांचा वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय व सामाजिक जिवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझेवरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेउन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, हि विनंती, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या पत्रात मित्रपक्षाचा उल्लेख केला आहे. पण त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव नमूद केलेले नाही. पण मित्रपक्ष म्हटल्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश होतो. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटलांचा रोख इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील 1995 ते 2014 या कालावधीत इंदापूरचे आमदार राहिले आहेत. आधी तीनदा अपक्ष आणि मग काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी बाजी मारली. या कालावधीत त्यांनी मंत्रिपदंही भूषवली. लोकसभेच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात महायुतीमध्ये वाद धगधगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटातील जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीने सुद्धा काही दिवसांपूर्वीच तोफ डागली होती. त्यामुळे हा वाद टोकाला गेल्याचे दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे.

COMMENTS