Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातपूर कॉलनीत गतिरोधक बसविण्यात यावे 

सातपूर - कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट  व आनंद छाया बस स्टॉप या  दरम्यान तीन गतिरोधक बसविण्यात आले अशी मागणी धम्

या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे
वृक्षतोड रोखण्यासाठी चार पथके तैनात
मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार

सातपूर – कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट  व आनंद छाया बस स्टॉप या  दरम्यान तीन गतिरोधक बसविण्यात आले अशी मागणी धम्म सागर प्रबोधन संघाच्या वतीने मनपा विभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली सातपूर कॉलनी परिसरातील आनंद छाया ते  कॉलनी कॉर्नर  या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.नवीन मॉडेल तयार झाल्याने  या रस्त्यावर  अल्पवयीन मुले व वाहनधारक बेदकारपणे वाहन चालवितात.यामुळे अपघात घडत आहे.जेष्ठ नागरिक,लहान मुले व महिला यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडवा लागत आहे.या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट असल्याने सायंकाळी महिला भाजी घेण्यास येतात.र

त्यांना रस्ता ओलांडणे सुध्दा कठीण जाते.भरघाव वाहनांमुळे अनेकदा या ठिकाणी किरकोळ अपघात घडले आहे.या ठिकाणी वाहनांना ब्रेक बसावा.यासाठी सातपूर कॉलनी रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे . यामुळे वाहनांची वेग मर्यादा कमी होईल व अपघाताचे प्रमाणही घटेल

याप्रकरणी शहर वाहतूक शाखा व मनपा अधिकारी यांनी या भागाची  पाहणी करावी व निर्णय घ्यावा. 

       यावेळी मनोज अहिरे,संजय जगताप,बाजीराव पगारे, प्रवीण गायकवाड,अजय साळवे,नारायण मोरे, सुरेश भवर ,अवधुत वावरे,मधुकर भाले ,किरण साळवे, दामोदर जगताप,आदीसह धम्मसागर प्रबोधन संघाचे पदाधिकारी उपस्थित होते

COMMENTS