Homeताज्या बातम्याविदेश

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

इस्लामाबाद ः पाकिस्तानमध्ये निवडणुका होऊनही कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पंतप्रधान कोण होणार असा

पूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा झटका
तुम्हाला दिव्यांग मुले होतील…इंदुरीकर महाराजांनी दिला शाप
जयभिम महोत्सवात थिरकणार नृत्य पावले !

इस्लामाबाद ः पाकिस्तानमध्ये निवडणुका होऊनही कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पंतप्रधान कोण होणार असा प्रश्‍न होता. मात्र रविवारी पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ हे देशाचे 24 वे पंतप्रधान बनले आहेत. त्यांना नॅशनल असेंब्लीमध्ये 201 खासदारांचा पाठिंबा मिळाला. 92 खासदारांनी पीटीआय समर्थक उमेदवार उमर अयुब यांना मतदान केले. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अयाज सादिक यांनी निकाल जाहीर केला. शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2022 मध्ये इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर शाहबाज शरीफ देशाचे पंतप्रधान झाले. तत्पूर्वी, संसदेचे अधिवेशन सुरू होताच पीटीआय समर्थक खासदार इम्रान खान यांच्या बाजूने ’आझादी’ आणि ’कैदी क्रमांक 804’च्या घोषणा देताना दिसले. प्रत्युत्तरात पीएमएल-एनच्या खासदारांनी ’लाँग लिव्ह नवाझ’च्या घोषणा दिल्या.8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीनंतर नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो यांच्या पीपीपी पक्षाने बहुमत मिळविण्यासाठी युती केली. या आघाडीने नवाझ यांचे धाकटे भाऊ आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते.

COMMENTS