कोरोना काळात अवैध बांधकामे जोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना काळात अवैध बांधकामे जोरात

टाळेबंदी कालावधीत आणि टाळेबंदी उठविल्यानंतहरी मुंबईत अवैध बांधकामे जोरात सुरू आहेत. मार्च, 2020 ते फेब्रुवारी, 2021 या कालावधीत महापालिकेकडे अवैध बांधकामांच्या तब्बल 13 हजारांहून अधिक तक्रारी आल्या.

नवजात बाळाचा हातातून पडून मृत्यू
बस थांबवून कंडक्टरची दरीत उडी | LOK News 24
देसवंडीच्या उपसरपंचपदी निकिता शिरसाट

 मुंबई / प्रतिनिधीः टाळेबंदी कालावधीत आणि टाळेबंदी उठविल्यानंतहरी मुंबईत अवैध बांधकामे जोरात सुरू आहेत. मार्च, 2020 ते फेब्रुवारी, 2021 या कालावधीत महापालिकेकडे अवैध बांधकामांच्या तब्बल 13 हजारांहून अधिक तक्रारी आल्या. वर्षभरात एकूण साडेनऊ हजार अवैध बांधकामांची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त 466 बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मालाड पी-उत्तर विभागात 429 तक्रारी दाखल झाल्या असून 342 अवैध बांधकामप्रकरणातील फक्त 62 प्रकरणात कारवाई झाली आहे. 

कोरोना काळात मुंबईत किती अवैध बांधकामांच्या तक्रारी आल्या, कितींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, याची माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेकडून घेतली आहे. महापालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात ऑनलाइन प्रणालीवरील 25 मार्च, 2020 पासून 28 फेबुवारी, 2021पर्यंतची माहिती देण्यात आली आहे. टाळेबंदीच्या काळात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासह सर्वच विभागांतील कर्मचारी कोरोना उपाययोजनांशी संबंधित कामांमध्ये व्यग्र होते. त्याचा फायदा उठवत भूमाफिया, झोपडीदादांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली आहेत. त्यावर कारवाई होत नसल्याने नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकांमध्ये प्रशासनावर वेळोवेळी टीकेची झोड उठवली आहे. पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द या भागांतून अवैध बांधकामांच्या सर्वाधिक म्हणजे सुमारे 1200 ते 3250 तक्रारी आल्या आहेत. कुर्ला परिसरात साकीनाका येथील खैरानी रोड भागात सर्वांत जास्त अवैध बांधकामे आहेत. फरसाण कारखाना, अवैध गॅरेज, गोदामे यांची संख्या मोठी आहे. या भागात गेल्या दोन वर्षांत मुंबईतील सर्वाधिक आगी लागल्या आहेत. काळबादेवी, चंदनवाडी, भुलेश्‍वर परिसराचा समावेश असलेल्या सी विभागातून 614 तक्रारी आल्या असून फक्त 24 प्रकरणी कारवाई झाली आहे. इमारत दुर्घटना झालेल्या मालाड मालवणी येथील गेट क्रमांक आठ परिसरात तसेच जवळच्या आंबोजवाडीमध्ये मोठी झोपडपट्टी आहे. येथे अवैध बांधकामांचे पेव फुटले आहे. घरांवर तीन ते चार मजले अवैधरित्या बांधण्यात आले आहेत. पालिकेच्या पी-उत्तर विभागात हा परिसर येत असून वर्षभरात येथून अवैध बांधकामांच्या 429 तक्रारी आल्या असून फक्त 62 प्रकरणी कारवाई झाली.

COMMENTS