देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा शहराचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. नगर येथील नाना पा
देवळाली प्रवरा ः राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा शहराचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. नगर येथील नाना पाटील वस्ताद तालीमचा मल्ल अक्षय पवार हा मल्हार केसरीचा मानकरी ठरला आहे. त्याला चांदीची गदा देऊन यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. देवळाली प्रवरा येथील कुलदैवत श्री. खंडोबा महाराज यात्रा उत्सव दोन दिवस धार्मिक, सांस्कृतिक व करमणुकीचा त्रिवेणी संगमाने मोठ्या उत्साहात पार पडली. या उत्सवा निमित्त, गंगास्नान, महाभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.
शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते पालखी पूजन संपन्न झाले. यावेळी माजी आ. चंद्रशेखर कदम, सदा कायगावकर, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड, यात्रा कमिटी अध्यक्ष अजित कदम, कार्याध्यक्ष अमित कदम, संपत जाधव, शैसंलेंद्रकुमार कदम,सतिष राऊत, केदारनाथ चव्हाण आदिंसह मान्यवर उपस्थित होते. देवळाली प्रवरापी.एम श्री.जिल्हा परिषदसेमी इंग्रजी शाळेच्या झांज पथक तर जेऊर येथील सनई पथक करमाळा येथील हलगी पथकाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी छबिना मिरवनुकीत जालन्यातील अंबड येथील सरस्वती ब्रास बँड व बारामती येथील अमर ब्रास बंड यांचा सामना झाला. शोभेच्या दारू चे मनमोहक कामाचा शहरवासीयांनी आनंद लुटला. कुस्त्यांचा जंगी हंगाम्यांसाठी पहिले बक्षीस मल्हार केसरी चांदीची गदा ठेवण्यात आले होते. या अंतिम कुस्तीसाठी मल्हार केसरी म्हणून नगर येथील नाना पाटील वस्ताद तालमीचा पैलवान अक्षय पवार व वीर बजरंग तालीम कोल्हारचा पैलवान विठ्ठल लोमटे यांच्यामध्ये अंतिम कुस्ती होऊन अक्षय पवार हा मल्हार केसरीचा मानकरी ठरला आहे. यावेळी पंच म्हणून नितीन घोलप, संजय कंगले, अल्लाउद्दीन शेख, प्रशांत होन, प्रकाश मोढे आदींनी काम बघितले. खंडोबा महाराज यात्रा उत्सवाची सांगता पुणे येथील शाहिर शैलेश लोखंडे प्रस्तुत ’सुंदरी’ मराठमोळ्या लावण्यांचा सदाबहार कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यात्रा यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी अध्यक्ष अजित कदम, कार्याध्यक्ष अमित कदम सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
COMMENTS