Homeताज्या बातम्यादेश

मुंबई इंडियन्सची विजयी सुरूवात

दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्सने मात

बेंगळुरू - महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळ

विराट कोहलीने तोडले सचिनचे तीन विक्रम
IPL 2023 मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला सुपरस्टार रजनीकांतने केला फोन
हॉकीचे जादूगार, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त “खेल उत्सव 2024” चे आयोजन

बेंगळुरू – महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. मुंबई इंडियन्सने दिल्लीविरुद्धचा सामना जिंकत विजयी सुरूवात केली आहे. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत हा सामना जिंकला आहे.

मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगमधील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जिंकला. रोमहर्षक झालेल्या सामन्यात संजीवन संजनाने सामना जिंकणारा षटकार ठोकत संघाला चार विकेट्सने विजय मिळवून दिला. यास्तिका भाटियाने या सामन्यात चमकदार कामगिरी केली. तिने आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. त्याचवेळी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ५५ धावा करण्यात यशस्वी ठरली. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ती ॲलिस कॅप्सीने सदरलँडच्या हातून बाद झाली. मुंबई इंडियन्सला अंतिम चेंडूवर पाच धावांची गरज होती. एस संजनाला शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून दिला. तिने लांबवर चेंडू लाँग-ऑनवर उंच आणि सुंदर षटकार मारून मुंबई इंडियन्सला एक रोमांचक विजय मिळवून दिला. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला २४ फेब्रुवारी (शनिवार) रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा सामना करणार आहेत.

COMMENTS