Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहाव्या मजल्यावरून मजुराचा मृत्यू

पुणे ः नियोजित इमारतीचे बांधकाम करताना दहाव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना फुरसुंगी भागात घडली. कामगाराच्या मृत्यू जबाबदार

Beed :.विद्यार्थ्यांनीचे प्रेत खांद्यावर घेऊन नातेवाईकांनी नदी केली पार (Video)
मळेगावथडीत 1 कोटी 19 लाखाचे विकासकामे पूर्ण ः अनिता उगले
श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार

पुणे ः नियोजित इमारतीचे बांधकाम करताना दहाव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना फुरसुंगी भागात घडली. कामगाराच्या मृत्यू जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आणि सेंट्रिंग ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानबाबू लग्नालाल प्रजापती (वय-44, रा. ग्रीन पार्क फेज 1, फुरसुंगी) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे.
या प्रकरणी त्याचा चुलत भाऊ पुत्तनलाल प्रजापती (वय-32, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील ग्रीन पार्क फेज 1 मध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. ज्ञानबाबू लग्नालाल प्रजापती दहाव्या मजल्यावर डक्टचे काम काम करत होते. ते तोल जाऊन अचानक खाली पडले. त्यानंतर घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. ग्रीन पार्क येथे सुरु असलेल्या बांधकाम साईटवर कामगारांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट आदी साधनसामग्री पुरविण्यात आली नव्हती. निष्काळजीपणा केल्याने कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस पवार करत आहेत.

COMMENTS