Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील डान्सबारला पोलिसांचे संरक्षण

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

मुंबई ः विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप यापूर्वी केले असून अनेक घोटाळे देखील उजेडात आणले आहे. मात्

भाजपची इच्छाशक्तीअभावीच आरक्षणाचा घोळ
नवीन नवरदेव बाशिंग बांधून तयार
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाबळेश्‍वरमध्ये 640 एकर जमीन हडपली

मुंबई ः विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप यापूर्वी केले असून अनेक घोटाळे देखील उजेडात आणले आहे. मात्र आता वडेट्टीवार यांनी मुंबईतील डान्सबारला पोलिसांचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलिसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. या विषयी वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक महिन्याला लाखो रूपये जमा करीत आहेत. जमा झालेल्या रकमेतून पोलिसांना, पोलिसांच्या खबर्‍यांना, स्थानिक गुंडांना हफ्ते दिले जात आहेत. त्यामुळे सिंडिकेटमधील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. डान्सबार पहाटेपर्यंत चालू आहेत. याबाबत स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार देऊन देखील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. याउलट सिंडिकेटमधील बारचालक तक्रारदारालाच धमक्या देत आहेत, मारहाण करीत आहेत. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील ऑर्केस्ट्राच्याआड सुरू असलेल्या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

COMMENTS