नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड आणि वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी कुलसचिव श्री. दिलीप भरड, विद्यार्थी कल्याण केंद्राचे प्र. संचालक डॉ. दयाराम पवार यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याबद्दल उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रमोद पवार यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS