राहाता( प्रतिनिधी): तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे 14 फेबु्रवारी रोजी नवीन आलेले डीवायएसपी शिरीष वमने यांना पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडव

राहाता( प्रतिनिधी): तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे 14 फेबु्रवारी रोजी नवीन आलेले डीवायएसपी शिरीष वमने यांना पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडवर हॉटेल साई श्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे. या बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन एका पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.
या छाप्यात दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले. महिला पोलीस अमलदार संगीता नागरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर वैभव कलूबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शिरीष वमने, लोणी पो.स्टे.नचे पो. नि. कैलास वाघ, हे कॉ इरफान शेख, हे.कॉ. अशोक शिंदे, हे.कॉ. असीर सय्यद, पो.ना. श्याम जाधव, संगीता नागरे, पो.कॉ. निलेश सातपुते, पो. कॉ. चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे, शिवाजी नर्हे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS