Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहज ध्यानाने कौटुंबिक स्वास्थ लाभते – सौ. सविता सोनवणे

सहज भुवन मध्ये हळदी कुंकू व सहज सेमिनार संपन्न

  अहमदनगर प्रतिनिधी - प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित अहमदनगर जिल्हा सहजयोग समिती च्या वतीने सहज भुवन, अहमदनगर येथे अहमदनगर जिल्ह्यातील म

अकोले तालुक्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक
नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अग्रवाल ; उपाध्यक्षपदी गांधी, निवडीनंतर जल्लोष
आर्थिक शिस्तीमुळेच प्रेरणा पतसंस्था प्रगतीपथावर

  अहमदनगर प्रतिनिधी – प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित अहमदनगर जिल्हा सहजयोग समिती च्या वतीने सहज भुवन, अहमदनगर येथे अहमदनगर जिल्ह्यातील महिला सहजयोग्यांसाठी सहज सेमिनार व हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी पुणे येथील सविता सोनवणे व औरंगाबाद येथील सौ. वर्षा खिस्ती यांनी सहज संतुलन, महिला शक्तीचे महत्व व विकास या बाबत माहिती दिली.

या प्रसंगी बोलतांना सौ. सविता सोनवणे म्हणाले सहज ध्यान हे एक आंतरिक ध्यान असून याचा फायदा सर्व जाती धर्मातील लोकांना होतो, महिलांनी ही ध्यान साधना आत्मसात केल्यास त्यांना आरोग्य निरोगीमय होऊन कौटुंबिक स्वास्थ लाभते या साठी ही ध्यान साधना नित्य नियमाने करणे गरजेचे आहे.

या वेळी वर्षा खिस्ती यांनी सहज प्रचार प्रसारा बद्दल महत्व पटवून देतांना सांगितले की सहज ध्यान साधनेचा प्रचार प्रसार हे एक सामाजिक कार्यच असून जास्तीत जास्त लोकांना या बाबत माहिती देऊन त्यांना सहज अनुभूती देणे गरजेचे आहे. ही ध्यान साधना केल्यामुळे माणसाला आरोग्यमय जीवन जगता येते व ताण तणावातून मुक्तता मिळते.

कार्यक्रमाचे सुरुवातीस सौ रजनी बनसोडे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात सहज ध्यान संतुलन घेऊन सुरुवात करण्यात आली. आभार मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गीता सातपुते यांनी केले. सदरहू कार्यक्रमांस संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, पारनेर सह अहमदनगर शहरातील सहजी महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते, शेवटी हळदी कुंकू चा कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीते साठी सौ. जयश्री सामलेटी, वासंती वैद्य, सौ. रुपाली जंगले, सौ. तुतारे ताई, सौ. अनिता अंदे, श्रीमती सुनंदा भापकर, सौ. पवार काकू, सौ. सविता कोडम, सौ. मनीषा संदुपटला व सौ आशा बैरागी यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS