Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली ः हिंगोली तालुक्यातील येळी येथे नापिकीमुळे कर्जाची परतफेड आता कशी करावी? या चिंतेने एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घड

केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
विवाहित महिलेची आत्महत्या ; पतीसह सासर्‍याला अटक
चिट्ठी लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या

हिंगोली ः हिंगोली तालुक्यातील येळी येथे नापिकीमुळे कर्जाची परतफेड आता कशी करावी? या चिंतेने एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात शुक्रवारी ता. 9 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरुण शंकर आप्पा निंबाळकर (47) असे मयत शेतकर्‍याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील येळी येथील अरुण निंबाळकर यांच्याकडे येळी शिवारामध्ये दोन एकर शेत आहे. या शेताच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या पश्‍चात घरी पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या शेतावर त्यांनी भारतीय स्टेट बँक शाखा बासंबा यांच्याकडून एक लाख चौदा हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. यावर्षी खरीप हंगामात त्यांनी सोयाबीन पेरणी केली. तसेच काही क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. मात्र यावर्षी कधी जास्त पाऊस, तर कधी पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीनचे पीक आलेच नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही, तर हीच परिस्थिती कापसाचीदेखील झाली आहे. दरम्यान नापिकीमुळे पीक कर्ज कसे भरावे? तसेच उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यामुळे मागील काही दिवसापासून ते अस्वस्थ होते. गुरुवारी ता. 8 घरी कोणी नसताना अरुण यांनी गळफास घेतला. सायंकाळी त्यांची आई त्यांना भोजनाचा डबा देण्यासाठी आली असताना त्यांना अरुण यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी तातडीने आरडाओरड केली. त्यानंतर शेजारी मदतीसाठी आले. या घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, उपनिरीक्षक आडे, जमादार खंडेराव नरोटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी विनोद निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीवरून बासंबा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

COMMENTS