Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा शिवसेना युवासेनेची कार्यकारिणी जाहीर

श्रीगोंदा शहर ः शिवसेना भवन पुणे येथे किरण साळी (युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली दि.3 फेब्रुवारी रोजी युवासेना पदाधिकारी मे

नगरला पाणी येईल हो .. पण, फेज टू विलंबाचे काय ? l Lok News24
जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी
फडणवीसांचा हल्लाबोल महाराष्ट्रात लोकशाही नाही, ‘लॉकशाही’ आहे; | ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | LokNews24

श्रीगोंदा शहर ः शिवसेना भवन पुणे येथे किरण साळी (युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली दि.3 फेब्रुवारी रोजी युवासेना पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील युवासेनेच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या युवासेना सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना तालुका प्रमुख निलेश गोरे यांच्या प्रयत्नाने नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये तेजस बबन गावडे (युवासेना उपतालुका प्रमुख. श्रीगोंदा), गणेश माणिक बाबर (युवासेना उपतालुका प्रमुख श्रीगोंदा), शुभम सुरेश कांडेकर (युवासेना उपतालुका प्रमुख. श्रीगोंदा), नवनाथ प्रकाश माने (जि.प.गट प्रमुख बेलवंडी), प्रतीक मनोहर बोरकर (जि.प.गट प्रमुख काष्टी), अतुल दादासाहेब दरेकर (जि.प.गट प्रमुख आढळगाव), हेमंत शिवाजी ठोंबरे (पं.स.गण प्रमुख बेलवंडी) युवासेना सचिव किरण साळी व युवासेना तालुका अध्यक्ष निलेश गोरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी बोलताना युवासेना तालुका प्रमुख निलेश गोरे म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यपद्धतीला प्रेरित होऊन श्रीगोंदा तालुक्यातील युवकांनी शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान.बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा प्रचार आणि प्रसार 80 टक्के समाजकारण व 20टक्के राजकारण या विचारांचा वारसा पुढे घेऊन येणार्‍या काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी हे सर्व युवक काम करतील.तसेच तालुक्यातील युवकांचे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम युवासेनेच्या माध्यमातून करण्यात येईल. युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेकराजे भोसले, आकाश कातोरे, योगेश गलांडे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS