Homeताज्या बातम्यामनोरंजन

१९ वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा २

मुंबई प्रतिनिधी - अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्र

विहीरीत पडलेल्या अस्वलला मिळाले जीवनदान
मग हेरगिरी कुणी केली ?
सलमान खान ची भाची बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण

मुंबई प्रतिनिधी – अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. सचिन पिळगावकर यांचे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा प्रेक्षकांचा ऑल टाइम फेवरेट असणारा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सचिन पिळगावकर यांनी एक खास व्हिडीओ शेअर करुन ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

सचिन पिळगावकर यांनी शेअर केला व्हिडीओ – सचिन पिळगावकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, “सरप्राईज, 19 वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा 2′ गणपती बाप्पा मोरया! शूटिंगला सुरुवात झाली आहे”. सचिन पिळगावकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

‘हे’ कलाकार साकारणार भूमिका -सचिन पिळगावकर यांनी व्हिडीओ शेअर करुन ‘नवरा माझा नवसाचा 2′ या चित्रपटाच्या स्टार कास्टची देखील माहिती दिली आहे. या व्हिडीओला त्यांनी चित्रपटातील कलाकारांना टॅग केलं आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2′ या चित्रपटात अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमल इंगळे, अली असगर, निर्मिती सावंत. निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 19 वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा 2′ ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट 2005 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील कलाकारांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता 19 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ‘नवरा माझा नवसाचा 2′ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत

COMMENTS