Homeताज्या बातम्यादेश

भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावर दबाव ः केजरीवाल

नवी दिल्ली ः भाजपवाल्यांकडून माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात येत आहे, यासोबतच भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. भाजपमध्ये गे

केजरीवालांना सर्वोच्च अंतरिम जामीन मंजूर
केजरीवालांना दिलासा नाहीच
अखेर केजरीवालांना ‘सर्वोच्च’ दिलासा !

नवी दिल्ली ः भाजपवाल्यांकडून माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात येत आहे, यासोबतच भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. भाजपमध्ये गेले तर सगळे खून माफ होतात, आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही काहीही झाले तरीही झुकणार नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
भाजपने मनीष सिसोदियांना यांनी तुरुंगात पाठवले. ते म्हणतात सिसोदियांनी भ्रष्टाचार केला आहे. सकाळी सहा वाजता ते शाळा-शाळांमध्ये जात होते. कुठला भ्रष्टाचारी सकाळी शाळांमध्ये जातो. जो भ्रष्टाचार करतो तो मद्यपान करतो, त्याला बाकीचीही नको ती व्यसने असतात, तसेच तो चुकीची कामे करतो. आम्ही काय केले आहे यातले? आम्ही दिल्लीच्या विकासासाठी काम करतोय तरी हे आमच्या मागे लागले आहेत. असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली, या लोकांनी सगळ्या एजन्सीज माझ्या मागे लावल्या आहेत. मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवल्यानंतर आता हे सगळे माझ्या मागे लागले आहेत. चांगल्या शाळा बांधणं हा सिसोदियांचा अपराध ठरला आहे. सत्येंद्र जैन रुग्णालयातल्या व्यवस्था चांगल्या कशा होतील आणि मोहल्ला क्लिनिक कशी तयार होऊन गरीबांना मदत मिळेल यावर भर देत होते, त्यांचा तो गुन्हा ठरल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

COMMENTS