Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेरला वराळ पतसंस्थेच्या ठेवीदारांचे उपोषण

पारनेर : तालुक्यातील निघोज येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी पारनेर पोलीस ठाण्याबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले

चोरीचा बनाव फसला…फिर्यादीच झाला आरोपी…
गौण खनिज उत्खनन करणा-या वाहनांवर जीपीएस बंधनकारक
अहमदनगर महानगरपालिकेच्या मु्ख्य लेखा अधिकाऱ्यास झाला दंड

पारनेर : तालुक्यातील निघोज येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी पारनेर पोलीस ठाण्याबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले  आहे .पतसंस्थेतील ठेवींची मुदती पंधरा वर्षांपुर्वीच संपलेल्या आहेत. त्यानंतर हि संस्था बंद पडली. त्यानंतर ठेवीदारांनी अहमदनगर  ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार केली होती. ग्राहक न्यायालयाने दहा वर्षांपूर्वी या ठेवीदारांना अकरा टक्के व्याजदराने ठेवी परत करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर या संस्थेवर पाच वर्षांसाठी प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. प्रशासक मंडळानेही ठेवीदारांना वार्‍यावर सोडले. प्रशासक मंडळानंतर 2019 ला  संस्थेवर पुन्हा संचालक मंडळ स्थापण झाले. पाच वर्षांपुर्वी स्थापन झालेल्या संचालक मंडळाने देखील अद्यापपर्यंत ठेवींच्या रकमा परत केल्या नाहीत.  सध्याचे  संचालक मंडळ  हे अकार्यक्षम असुन ठेवीदारांची ते फसवणूक करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर ठेवीदारांचे हित संरक्षण कायदा ( 2000 ) अन्वये गुन्हा दाखल करावा म्हणून ठेवीदार पारनेर पोलिस ठाण्याबाहेर उपोषणाला बसले आहेत.  पारनेर पोलिस निरीक्षक समीर बारवकर गुन्हा दाखल करण्याऐवजी उपोषण करणारांनाच उपोषण केले तर कारवाई करण्याची नोटीस बजावून उपोषणकर्ते यांनाच मनाई उपोषणास करत आहेत. ठेवी मिळत नाही तर सहकार विभागाकडे पाठपुरावा करा, उपोषण करा असा सल्ला देत आहेत. वराळ पतसंस्थेच्या संचालक मंडळावर  पंधरा वर्षांपुर्वीही ठेवीदारांचे पैसे परत न केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर चौकशीअंती तत्कालीन संचालक मंडळाला दोषी धरून कलम 88 अन्वये साडेसात कोटी सपयांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती. त्यानंतर आलेले प्रशासक मंडळ व सध्याचे संचालक मंडळ यांनी दहा वर्षांत या दोषी संचालकांवर कोणतीही वसुलीची कारवाई केलेली नाही. त्यामुळे ही संस्था आर्थिक अडचणीत आहे. जबाबदारी निश्‍चित केलेल्या रकमांची दोषी  संचालक मंडळाकडून वसुली केल्यास वराळ पाटील संस्थेच्या सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळणार आहेत परंतु, विद्यमान संचालक मंडळ व  सहकार खाते दोषी संचालक मंडळावर मेहरबान आहे, त्यामुळे या पतसंस्थेचे अनेक ठेवीदार अडचणीत आलेले आहेत.

आजपासून जनावरांसह उपोषण ः पळसकर – मी ठेवी मिळण्यासाठी दहा-बारा वर्षांपासुन पाठपुरावा करत आहे. पतसंस्था, सहकार विभाग व पोलीस प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास बुधवार 31 जानेवारीपासून आम्ही ठेवीदार आमच्या जनावरे व कुटुंबीयांसह उपोषण चालू करणार असल्याचा इशारा निवृत्ती पळसकर, ठेवीदार यांनी दिला आहे.

COMMENTS