धारावी पुन्हा एकदा कोरोनामुक्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धारावी पुन्हा एकदा कोरोनामुक्त

कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. धारावीत आज शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.

 50  खोके एकदम ओके चे विधानसभेत पुन्हा झळकले बॅनर 
खासदार किर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करावी ः शिशीर शिंदे
शिराळा तालुक्यात लॉकडाउननंतर पहिल्या कुस्ती मैदानास प्रारंभ

मुंबई / प्रतिनिधीः कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. धारावीत आज शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावीत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. दररोजची रुग्णसंख्या अंदाजे 400हून अधिक नोंदवली जात होती.  

    या वेळी महापालिकेने ’मिशन झिरो’, ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यासह विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या. परिणामी यंदाच्या जानेवारीपर्यंत धारावी कोरोनामुक्त झाली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत धारावीत संसर्ग पुन्हा वाढू लागला होता; मात्र आधीच्या अनुभवावरून महापालिकेने उपाययोजना आणखी बळकट करत संसर्ग नियंत्रणात आणला. गेल्या महिन्याभरापासून धारावीत एक ते वीसपर्यंत नवीन रुग्ण आढळून येत होते; मात्र मागील काही दिवसांपासून एक ते दोन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील कोरोना साथीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आज धारावीत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. धारावी विभागात आतापर्यंत कोरोनाबाधित सहा हजार 861 रुग्णांची नोंद झाली आहे. धारावी पाठोपाठ दादर आणि माहीममधील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येतो आहे. दादर भागात आतापर्यंत नऊ हजार 557 रुग्णांची नोंद झाली आहे, तर आज फक्त तीन रुग्ण सापडले आहेत. माहीममध्ये आज दिवसभरात सहा रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सध्या सातशेच्या आसपास असून कोविड रुग्णवाढीचा दर 0.10 टक्के इतका खाली आला आहे, तर रुग्णदुपटीचा कालावधी वाढून तब्बल 653 दिवसांवर पोहचला आहे.

COMMENTS