Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकरोडच्या बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलची दुरावस्था निवेदनाचे पाढे गाऊनही मनपा निगरगठ्ठच 

थेट विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन सादर

नाशिक प्रतिनिधी - नाशिक महापालिकेचे सर्वात मोठे समजले जाणारे नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल सध्या समस्यांच्या विळख्

सलमान खानच्या जीवनावरील डॉक्‍युड्रामाचे काम जोरात सुरू (Video)
स्वातंत्र्य लढ्यात क्रांती दिनाचे महत्त्व अतुलनीय ः थोरात
अकोला ,नागपूर निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाला – नवाब मलिक | LOKNews24

नाशिक प्रतिनिधी – नाशिक महापालिकेचे सर्वात मोठे समजले जाणारे नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल सध्या समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या हॉस्पिटलकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिक व रुग्णांकडून सातत्याने होत असल्याने अनेकदा निवेदने सादर करूनही महापालिका प्रशासन रुग्ण व जनतेच्या आक्रोशाकडे लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे. नाशिकरोडसह आजुबाजूच्या जवळपास ४० ते ४५ खेड्यांसाठी कधीकाळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आधारभूत पर्याय ठरलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आज समस्यांचे आगार बनले आहे.  नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे बरचसे काम अपूर्णस्थितीत असतांना जुने बिटको रुग्णालय तेथे का शिफ्ट केले असे नागरिकांना तर्हेचे प्रश्न पडत असले तरी ते काम लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा मायबाप जनता करत असणार.

नाशिकरोड चे जुने बिटको हॉस्पिटल आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ओळखले जाते आहेत असे असले तरी  स्थानिक भागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि विकासाच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया नियमित होत रहावी, या उदात्त हेतूने स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात करण्यात आली व करण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेची निर्मितीही याच उद्देशाने करण्यात आली आहे. मात्र, या निर्मितीच्या मूळ उद्देशालाच बगल देण्याचे काम महानगरपालिका प्रशासनाकडून अव्याहत सुरू असल्याची बाब माजी नगरसेवक तथा आरोग्यदूत जगदीश पवार यांच्या निवेदनाच्या माध्यमातून समोर येत असते. असे असले तरी हॉस्पिटल चे वास्तवही नाकारता येण्यासारखे नाही. 

हॉस्पिटलमध्ये भेडसावत असलेल्या समस्यां कोणत्या ? 

१) अपुरे मनुष्यबळ 

२) स्त्री रोग तज्ञांची मर्यादित संख्या

३) सोनोग्राफी मशीन 

४) काही लिफ्ट बंद अवस्थेत 

५) रिपोर्टची अनुपलब्धता 

६) त्वचारोगतज्ञ नाहीत 

७) शिशु शीश्रुषा कक्षाकडे दुर्लक्ष 

८) एक वार्ड एकच सिस्टर 

९) एम आर आय रिपोर्टची अनुपलब्धता

१०) दोन पूर्णवेळ फिजिशियन ची गरज

११) दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबणे 

१२) शौचालयाची दुरावस्था 

१३) कॅज्युलिटी वार्ड असुरक्षित

१४) नेत्ररोगतज्ञाचा अभाव

१५) गर्भवती कडे दुर्लक्ष

१६) अर्धवट वीजपुरवठा

१७) रुग्णांसाठीच्या चादर व बेडशीट ची दुरावस्था

COMMENTS