Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालाडमध्ये अनेक झोपड्या जळून खाक

मुंबई ः मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील मालाड त्रिवेणी नगर झोपडपट्टीला मोठी आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्नि

बुलढाण्यात भरधाव कारच्या धडकेत तीन महिला ठार
इंदिरा गांधी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात
तब्बल तीन वर्षांनंतर महिलेच्या खूनप्रकरणी गुन्हा

मुंबई ः मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील मालाड त्रिवेणी नगर झोपडपट्टीला मोठी आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मालाड पूर्वेकडील कुरार परिसरातील त्रिवेणी नगर या झोपडपट्टीला मोठी आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई अग्निशमन दलासोबतच स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने आगीच्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

COMMENTS