Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

नागपूर शहरातील घटना

नागपूर ःनागपुरात झोपडीला आग लागल्याने दोन सख्या भावडांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्द

फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधक आक्रमक  
लोकसभा निवडणुकीत मविआला कौल ?
रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही – भरत जाधव

नागपूर ःनागपुरात झोपडीला आग लागल्याने दोन सख्या भावडांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत हजारी पहाड सेमिनरी हिल परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून थंडीपासून वाचण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीत देवांश रणजित उके (वय, 07) आणि प्रभास रणजीत उके (वय, 02) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. सेमिनरी हिल भागात व्हेटर्नरी कॉलेजमागे गोविंद गोरखेडे कॉम्प्लेक्स आहे, त्या समोरच ही झोपडी आहे. थंडीचा कडाका वाढल्याने हात शेकण्यासाठी देवांश, प्रभास आणि त्यांच्या बहिणीने झोपडीत शेकोटी पेटवली. ज्यामुळे झोपडीला आग लागली. ज्यात देवांश आणि प्रभास यांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने, मोठी मुलगी ओरडत बाहेर आल्याने ती बचावली.

COMMENTS