Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर शहरातील विकास आराखडा आणि ओढ्या-नाल्यांचा प्रश्‍न

डॉ. अशोक सोनवणेअहमदनगर ः कोणत्याही शहराची उभारणी ही भविष्यातील लोकसंख्या, तेथील साधनसंपत्ती याचा विचार करून करावी लागते. 1972 साली अहमदनगर शहराचा

महापालिकेतील ‘प्रशासकराज’ कारवाईचा बडगा उगारणार का ?
अहमदनगर शहरातील ओढ्या-नाल्याप्रश्‍नी प्रशासनाकडून महापालिकेला पाठिशी घालण्याचा प्रकार
स्वाईन फ्लू व कोरोना बाधित रुग्णांची तातडीने माहिती द्या

डॉ. अशोक सोनवणे
अहमदनगर ः कोणत्याही शहराची उभारणी ही भविष्यातील लोकसंख्या, तेथील साधनसंपत्ती याचा विचार करून करावी लागते. 1972 साली अहमदनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठीं सरकारला 12 वर्षे लागली. त्यावेळी नवनीतभाई भाई बार्शीकर अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. शहराचा आराखडा (प्लॅन) करण्याचे काम करणारे अधिकारी, कर्मचारी शासकीय विश्राम गृह येथे असायचे. तितक्याच तत्परतेने हा आराखडा तयार करण्यात आला. म्हणूनच प्रोफेसर कॉलनी, कुष्ठधाम रोड, हडको आदीच्या समावेशाबरोबर सावेडी उपनगर निर्माण झाले. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी हडको प्रकल्पासाठी जागा आरक्षित झाली. आज प्रेमदान हडको जे निर्माण झाले ती नवनीतभाईंची देण आहे. मात्र आज या शहराला बकाल स्वरूप प्राप्त करून देणारे ते कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
1972 साली नवनीतभाईंनी आपल्या दूरदृष्टीने 50 वर्षांपूर्वी शहराचे नियोजन करून ठेवले होते. मात्र गेल्या दीड-दोन दशकांपासून आणि विशेषतःमहानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून शहराचे लचके तोडण्याचे काम काही महारथींनी सुरू केले आहे. उद्या जर सांगली, कोल्हापूरसारखा पाऊस झाला तर, अहमदनगरकरांची अवस्था काय होईल, याचा विचार न केलेलाच बरा. त्यामुळे शहराच्या विकासासाठी संवेदनशीलतेने काम करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे शहरातील ओढया-नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याची गरज आहे, यासोबतच ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना पर्यायी घरांची व्यवस्था करून दिल्यास त्यांचाही रोष राहणार नाही, मात्र यासाठी उपाययोजना करणार कोण ? हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो.

COMMENTS