Homeताज्या बातम्यादेश

केंद्राकडून 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सोहळ्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने येत्या सोमवारी 22 जानेवारी रोजी अर

लसींच्या तुटवड्यावर नितीन गडकरींनी केंद्राला दिला सल्ला l पहा LokNews24
कोमल वाकळे हीचे बाबुजी आव्हाड महाविद्यालयात जल्लोषात स्वागत
काँगे्रसची ‘नारी न्याय गॅरंटी’ योजनेची घोषणा

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सोहळ्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने येत्या सोमवारी 22 जानेवारी रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार या दिवशी केंद्र सरकारची सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहणार आहेत. भाजपशासित राज्यांतील अनेक सरकारांनी 22 जानेवारीच्या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, आसाम, छत्तीसगड या राज्यांत 22 जानेवारीला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मांस आणि माशांच्या विक्रीवरही बंदी घातली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सात दिवस आधी, म्हणजे 16 जानेवारीला अयोध्या मंदिर परिसरात या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या आधी दररोज विशिष्ट विधी केले जात आहेत.

COMMENTS