Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहराची वाट लावण्यात महापालिकेचे योगदान सर्वाधिक

ओढ्या-नाल्यांची पाहणीनंतर कारवाईचे घोडे अडले कुठे ?

अहमदनगर ः अहमदनगर शहरातील ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आल्याचे प्रकार उजेडात आल्या आहेत. जर शहरात अतिवृष्टी झाली तर, पाणी वाहून

अवगुण सोडून सद्गुण धारण करणे हिच गुरुदक्षिणा ः  सरला दीदी
महात्मा फुले कृषि विद्यापीठाला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक
विद्युत ठेकदार 51 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडला

अहमदनगर ः अहमदनगर शहरातील ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आल्याचे प्रकार उजेडात आल्या आहेत. जर शहरात अतिवृष्टी झाली तर, पाणी वाहून जाण्यास जागाच नाही. कारण ओढ्या-नाल्यांत पाईप टाकून त्यांना मोठ्या प्रमाणात बंदिस्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वीच झालेल्या पावसांमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचे वास्तव असतांना महानगरपालिका कारवाईकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल नेहमीच उपस्थित होतांना दिसून येत आहे.
अहमदनगर शहराची बकाल अवस्था करण्यात, शहराची वाट लावण्यात सर्वाधिक योगदान कुणाचे असेल तर ते महानगरपालिकेचे. वास्तव म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत खुद्द जिल्हाधिकारी महोदयांनीच वरील वाक्य उद्धत केले होते. शहरातील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे नैसर्गिक प्रवाह खुले करण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडिया आणि तक्रारदार सूरज नामदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकार्‍यांनी देखील आदेश देवून कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे. महानगरपालिकेने कारवाईचे सोपस्कार म्हणून ओढ्या-नाल्यांची पाहणी केली. त्यानुसार त्यांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे मान्य करत, एक 148 घरांची यादी देखील तयार केली आहे. मात्र ही यादी अर्धवट असून, त्यात अनेक अतिक्रमणधारकांचा समावेश केलेला नाही. मात्र ही यादी जाहीर करून, त्यांच्यावर कारवाई करण्यात महापालिकेतील नगररचना विभाग धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

ओढ्या-नाल्यावर बांधकामाची मंजूरी महापालिकेचीच – ओढ्या-नाल्यावर घराचे बांधकाम झाल्याचे अनेकठिकाणी दिसून येत आहे. विशेष म्हणजे बांधकामाची परवानगी महानगरपालिकेकडून मिळालेली आहे. बांधकाम अनाधिकृत असतांना त्यांना त्यावेळी परवानगी कशी दिली, कोणते अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करत या परवानग्या दिल्या, याची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र आता त्याच अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने कारवाई केली तर, महानगरपालिकेचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळेच महानगरपालिकेकडून कारवाई करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

COMMENTS