Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाले

शर्मिला ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अर्धांगिणी शर्मिला ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे य

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया
 मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही  – शर्मिला ठाकरे
शर्मिला ठाकरे यांनी केले एन्काउंटरचे समर्थन

मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अर्धांगिणी शर्मिला ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या माणसामुळे अनेक नेत्यांना शिवसेना सोडावी लागली, त्याच नेत्याच्या हातातून आज पक्ष सुटला. यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले, असे त्या म्हणाल्यात.
मनसेने विक्रोळीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, या महिन्याच्या 10 तारखेला एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. शिवसेनेतील बड्या नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावे लागले होते, त्याच माणसाच्या हातून या दिवशी पक्ष सुटला. गत 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्वाळा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर शर्मिला ठाकरे बोलत होत्या. तत्पूर्वी, डिसेंबर महिन्यात शर्मिला यांनी दिशा सालियन प्रकरणात उद्धव यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली होती. या प्रकरणी आदित्य यांच्या अंगावर शिंतोडे उडवण्यात येत असले तरी तो तसे काही करेल असे मला वाटत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आभार मानण्याची वेळ मला उद्धव ठाकरेंनी आयुष्यात केव्हाच दिली नाही. किणी प्रकरणापासून आजपर्यंत मिळेल तेव्हा त्यांनी आमचे चिमटे काढले. निदान जो भाऊ त्यांच्यासोबत लहानपणापासून मोठा झाला, त्याच्यावर थोडातरी त्यांनी विश्‍वास ठेवायला पाहिजे होता. मी माझ्या पुतण्यावर (आदित्य ठाकरे) विश्‍वास ठेवला. पण त्यांनी आपल्या भावाला केव्हाच मदत केली नाही. त्यांनी आम्हाला केवळ टोमणे मारले, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. उल्लेखनीय बाब म्हणजे गत महिन्यात राज व उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळी ठाकरेंपुढील आव्हानांचा डोंगर पाहता हे दोघे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली होती. शर्मिला यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले होते. माझ्या नंणदेच्या मुलाचा साखरपुडा होता. घरातील सर्व लोक अशावेळी एकत्र येतात. माझी नणंद राजकारणात नाही. राज जसा तिचा भाऊ आहे, तसा उद्धवही आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांना राज व उद्धव एकत्र येणार का? असे विचारले असता त्यांनी ’बघुया’ असे एका शब्दात उत्तर दिले होते.

COMMENTS