Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपा सुपर वॉरियर्सचा ‘महाविजय – २०२४’ मेळावा नाशिक येथे पार पडला

नाशिक - भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाध

केंद्राने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याला मान्यता दिल्यानंतर छत्रपती संभाजी नगर मध्ये जल्लोष
औंधच्या तनपुरे कुटुंबियांकडून गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
20 वर्षात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिल्ली कळाली नाही | LOK News 24

नाशिक – भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्सचा ‘महाविजय – २०२४’ मेळावा नाशिक येथे पार पडला.

या बैठकीत आगामी निवडणूक व पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता महत्त्वपूर्ण चर्चा तसेच सरल ॲप, नमो ॲप, बूथ सशक्तीकरण अभियान, आदि महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे.त्यासाठी,सर्वांनी प्रयत्न करावेत.तसेच,आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी जोमाने तयारीला लागण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्षांनी बोलतांना केले.

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.भारती पवार,राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.गिरीषभाऊ महाजन, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश सरचिटणीस रवींद्र अनासपुरे,आ.राहुल आहेर,आ.देवयानी फरांदे, आ. सिमा हिरे,आ.राहुल ढिकले, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ,लक्ष्मण सावजी,बाळासाहेब सानप, गणेश गीते, दिनकर अण्णा पाटील, सुरेश आण्णा पाटील,निलेश कचवे,सुनील केदार यांच्यासह जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS