गुवाहाटी ः आसाम सरकारने 22 जानेवारी हा दिवस राज्यात ड्राय डे म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या दिवशी अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा हो

गुवाहाटी ः आसाम सरकारने 22 जानेवारी हा दिवस राज्यात ड्राय डे म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या दिवशी अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 7 जानेवारी रोजी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर राज्याचे पर्यटन मंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी ही माहिती दिली. त्याचवेळी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनीही राज्यात 22 जानेवारी हा ड्राय डे असेल, अशी घोषणा केली आहे.
COMMENTS