Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्बंध शिथील झाल्यानंतर राज्यात विजेच्या मागणीत वाढ

मुंबई : राज्यात कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात थैमान घातल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी उसंत घेतली आहे. तसेच राज्यसरकारने 25 जिल्ह्यात निर्बंध शिथ

बनावट ई-मेल पाठवून खाते गोठवले
रेल विकास निगम लिमिटेडला नवरत्न दर्जा
अमृतपाल सिंग लवकरच शरण येऊ शकतो

मुंबई : राज्यात कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात थैमान घातल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी उसंत घेतली आहे. तसेच राज्यसरकारने 25 जिल्ह्यात निर्बंध शिथील केल्यानंतर राज्यात विजेच्या मागणीत वाढ होतांना दिसून येत आहे. राज्यात शनिवारी सुमारे 19 हजार 627 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली.
जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे एसी, कुलर, कृषिपंप आदी उपकरणांचा वापर कमी झाल्याने विजेची मागणी चांगलीच घसरली होती. 5 जुलै रोजी राज्यात 20 हजार 600 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली होती. परंतु दुसर्‍या आठवड्यापासून पावसाने राज्यातील कोकण, पुणे, विदर्भ, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागात मुसळधार हजेरी लावल्याने विजेच्या मागणीत मोठी घट झाली होती. 22 जुलै रोजी विजेची मागणी सुमारे 16 हजार मेगावॅटपर्यंत कमी नोंदवली गेली होती. ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा राज्यात तुरळक पाऊस सुरु असल्याने तापमानात वाढ झाली आहे. परिणामी घरगुती आणि वाणिज्यिक ग्राहकांकडूळ कुलर, एसी, पंखे आदी इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. तसेच कृषी पंपांचा वापरही वाढला आहे. यातच लॉकडाउनच्या अनेक निर्बंध शिथिल केल्याने विजेच्या वापरावरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे 6 ऑगस्टला राज्यात विजेची मागणी 19 हजार 172 मेगावॅटपर्यंत नोंदवली गेली. तर 7 ऑगस्ट रोजी यामध्ये आणखी भर पडून ही मागणी 19 हजार 627 मेगावॅट झाली. पावसाने दडी मारल्यामुळे आणि तापमानात मोठया प्रमाणावर वाढ झाली असल्यामुळे आगामी दिवसांत पुन्हा एकदा वीजेची मागणी वाढू शकते.

COMMENTS