Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. स्वप्निल डी. निला मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी

मुंबई ः भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आयआरटीएस) 2011 बॅचचे अधिकारी डॉ. स्वप्निल धनराज निला यांनी 1 जानेवारी 2024 रोजी, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क

बॉलिवूड कधीच संपणार नाही, रोहित शेट्टीचं मोठं विधान | LOKNews24
प्रजासत्ताक दिनी मानवधन संस्थेत शहीद पुत्राच्या वीरमातेच्या हस्ते फडकवला तिरंगा
ईपीएस ९५ निवृत्त कर्मचाऱ्यांचे धुळ्यात रस्ता रोको

मुंबई ः भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आयआरटीएस) 2011 बॅचचे अधिकारी डॉ. स्वप्निल धनराज निला यांनी 1 जानेवारी 2024 रोजी, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) म्हणून पदभार स्वीकारला आहे.  डॉ. स्वप्निल निला हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून वैद्यकीय पदवीधर असून, डॉ. शिवराज मानसपुरे यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. स्वप्निल निला हे मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे.  तसेच डॉ. स्वप्निल निला यांनी विभागीय परिचालन व्यवस्थापक (आईसी), भुसावळ विभाग; विभागीय परिचालन व्यवस्थापक, मुंबई विभाग; क्षेत्र व्यवस्थापक (एरिया मॅनेजर), भुसावळ विभाग आणि सहाय्यक परिचालन व्यवस्थापक (गुड्स), भुसावळ विभाग याठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले आहे.  डॉ. स्वप्निल निला यांना 2019 मध्ये राष्ट्रीय रेल्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना 2016 मध्ये महाव्यवस्थापकाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. वर्ष 2014 मध्ये सर्वोत्कृष्ट रेल्वे सेवा अधिकारी, वाणिज्यिक विभाग या पुरस्काराचे देखील डॉ. स्वप्निल निला हे प्राप्तकर्ता आहेत.

COMMENTS