Homeताज्या बातम्यादेश

झारखंडमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू

रांची ः झारखंडमध्ये नववर्षाची पार्टी करून घरी परतणार्‍या आठ मित्रांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. जमशेदपूर य

पंचमहालमध्ये जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
भीषण अपघात ! चिमुकल्या मुलीचा मृत्यू
यवतमाळ-अमरावती मार्गावरील अपघातात चौघांचा मृत्यू

रांची ः झारखंडमध्ये नववर्षाची पार्टी करून घरी परतणार्‍या आठ मित्रांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. जमशेदपूर येथील बिष्टूपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्किट हाऊस परिसरात सदर अपघात झाला. अपघात इतका भीषण आहे की, त्यात गाडीचा चुराडा झाल्याचे दिसत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात चाललेली गाडी पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकाला आदळली आणि त्यानंतर पुढे जाऊन झाडावर आदळून उलटली.

गाडी झाडावर आदळून उलटली तेव्हा त्याचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकायला गेला. ज्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. गाडीमध्ये बसलेले सहा युवक जागीच ठार झाले तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडीतील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिले. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले. मृत युवक कुलुप्तांगा भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. जमशेदपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक कौशल किशोर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पाच जण बसण्याची क्षमता असलेल्या गाडीत आठ युवक बसले होते. गाडी पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकाला आदळली आणि त्यानंतर पुढे असल्येल्या झाडावर फेकली गेली. गाडीतील पाच युवक जागीच ठार झाले, तर इतर तिघांना रुग्णालयात नेले असताना त्यापैकी एकाचा वाटेतच मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू आहेत. गाडी अतिवेगात होती, असेही ते म्हणाले.

COMMENTS