Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन वर्षीय चिमुकल्‍याच्‍या फुफ्फुसातून काढला नारळाचा तुकडा

नारायणी हॉस्‍पिटलमध्ये डॉ.स्‍वप्‍निल साखलांकडून विना वेदना उपचार

नाशिक- भरपुर उपचार घेऊनही खोकला थांबत नसल्‍याने दोन वर्षीय बालकाचे पालक कासावीस झाले होते. संगमनेर तालुक्‍यातील अकोले येथील या बालकाला स्‍थानिक ड

नारायणी हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण
नारायणी हॉस्पिटल तर्फे गामने मैदानावर उद्या आरोग्यावर मॉर्निंग टीप्स
नारायणी हॉस्पिटल तर्फे आरोग्यावर मॉर्निंग टीप्स

नाशिक- भरपुर उपचार घेऊनही खोकला थांबत नसल्‍याने दोन वर्षीय बालकाचे पालक कासावीस झाले होते. संगमनेर तालुक्‍यातील अकोले येथील या बालकाला स्‍थानिक डॉक्‍टरांच्‍या सल्‍यानुसार नाशिकच्‍या नारायणी हॉस्‍पिटल येथे डॉ.स्‍वप्‍निल साखला यांच्‍याकडे तपासणीसाठी आणले. फुफ्फुसात नारळाचा तुकडा आढळल्‍याचे निदान करतांना कुठलीही चिरफाड न करता अत्‍याधुनिक स्‍वरुपाच्‍या ब्रॉन्‍कोस्‍कोपीद्वारे बालकावर यशस्‍वी उपचार करण्यात आले असून, १२ तासांच्‍या आत घरी सोडण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती देतांना नारायणी हॉस्‍पिटलचे संचालक व फुफ्फुसविकार तज्‍ज्ञ डॉ. स्‍वप्‍निल साखला म्‍हणाले, दोन वर्षीय बालकाचा खोकला थांबत नसल्‍याने त्‍याच्‍या पालकांनी स्‍थानिक बालरोग तज्‍ज्ञांचा सल्‍ला घेतला. यावेळी डॉ.देशपांडे व डॉ.अमेय देशमुख यांनी त्‍यांना सिटीस्‍कॅन करण्याचा सल्‍ला दिला. या चाचणीमध्ये फुफ्फुसात उजव्‍या बाजूला काहीतरी अडकलेले असल्‍याचे आढळून आले. उत्तरीय उपचारासाठी डॉक्‍टरांनी नाशिकला नारायणी हॉस्‍पिटलला भेट देण्याचा सल्‍ला दिला.

त्‍यानुसार बालरुग्‍णासोबत त्‍याचे पालक नारायणी हॉस्‍पिटलमध्ये आले. वैद्यकीय अहवालाचा अभ्यास केल्‍यानंतर फुफ्फुसात नारळाचा तुकडा अडकल्‍याचे लक्षात आले. उपचाराची प्रक्रिया पालकांना समजावून सांगतांना पुढील एक तासाच्‍या आत प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. विशेष म्‍हणजे अडकलेला तुकडा काढण्यासाठी कुठलीही चिरफाड करण्यात आली नाही. हॉस्‍पिटलमध्ये उपलब्‍ध असलेल्‍या क्‍लायो कंपनीच्‍या अत्‍याधुनिक स्‍वरुपाच्‍या मशीनच्या सहाय्याने ब्रॉन्‍कोस्‍कोपीद्वारे नारळाचा तुकडा काढण्यात आला. यानंतर बालकाला काही क्षणात मोकळ्याने श्‍वास घेता येऊ लागला व तब्‍येतीत सुधारणा जाणवली. यशस्‍वी उपचार केल्‍यानंतर अवघ्या १२ तासांत त्‍याला डिस्‍चार्ज दिला जातो आहे.

याबाबत रुग्‍णाच्‍या पालकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बालकाच्‍या वेदना टळल्‍या व काही तासात तो सामान्‍य जीवन जगण्या सज्‍ज झाल्‍याबद्दल पालकांनी डॉ.स्‍वप्‍निल साखला आणि नारायणी हॉस्‍पिटलच्‍या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

COMMENTS