Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगावर शिंकल्याच्या रागातून जाळला चेहरा

मुंबई ः अंगावर शिंकल्याच्या रागातून 16 वर्षांच्या मुलाने मित्राचा चेहरा जाळल्याचा प्रकार अंधेरीत घडला आहे. जखमी मुलाला कूपर रुग्णालयात उपचारासाठी

मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार ?
संगमनेरमध्ये निसर्गप्रेमी एकवटले
मालेगाव स्फोट प्रकरणाला नवे वळण; चारही आरोपींची दोषारोप पत्रातून मुक्तता

मुंबई ः अंगावर शिंकल्याच्या रागातून 16 वर्षांच्या मुलाने मित्राचा चेहरा जाळल्याचा प्रकार अंधेरीत घडला आहे. जखमी मुलाला कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी 16 वर्षांच्या मुलाविरोधात डीएन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडित दोघेही मित्र बुधवारी भेटले होते. त्यावेळी मोबाइलवर खेळत असताना पीडित मुलगा आरोपी मुलाच्या अंगावर शिंकला. यामुळे रागावलेल्या मित्राने मुलाच्या चेहर्‍यावर सॅनेटायजर फेकले व लायटरने त्याचा चेहरा जाळला. अंधेरीच्या गोल डोंगरी रोड येथे ही घडली आहे.

COMMENTS