Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या चार्वी कोठारीची प्रज्ञाशोधसाठी निवड        

कोपरगाव तालुका ः भारत सरकारच्या एनसीईआरटी व एनसीएसएन यांच्या संयुक्त विद्यमाने विध्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्ष

देशात व राज्यात परिवर्तनाची लाटः आकाश नागरे
Sangamner : जि प सदस्य सिताराम राऊत यांनी शासनाच्या निधीचा केला गैरवापर (Video)
जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद ; नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळले

कोपरगाव तालुका ः भारत सरकारच्या एनसीईआरटी व एनसीएसएन यांच्या संयुक्त विद्यमाने विध्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे घेण्यात आली. या स्पर्धेत मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्र विभागातील 20 जिल्ह्यातील 130 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेमध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेवुन निकाल जाहिर करण्यात आला. प्रत्येक वर्गातुन तीन विध्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी राष्ट्रीय  पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये संजीवनी अकॅडमीची चार्वी योगेश  कोठारी हिची राज्य स्तरावर इयत्ता दहावीतुन प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. तिला परभणी येथे अधिष्ठाता डॉ.उदय खोडके यांचे हस्ते सर्टिफिकेट व ट्रॉफी देवुन सन्मानित करण्यात आले. सर्व गुण संपन्न विध्यार्थी घडविण्यासाठी स्कूलच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न केले जातात, त्या प्रयत्नांना प्रत्येक ठिकाणी यश मिळत असून संजीवनी अकॅडमीचा नावलौकिक सर्व दुर जात आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी चार्वीचे अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनीही चार्वीचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्या शैला झुंजारराव व शिक्षक विलास भागडे उपस्थित होते.

COMMENTS