Homeताज्या बातम्यादेश

निवृत्त एसएसपीची दहशतवाद्यांकडून हत्या

नमाज अदा करत असताना दहशतवाद्यांचा गोळीबार

बारामुल्ल ः जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील जेंटमुल्ला येथील मशिदीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात निवृत्त एसएसपी मोहम्मद शफी यांची

ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातील ११७ डॉक्टर संपावर 
Ahmednagar : नगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह (Video)
मेथक्युलोन अमली पदार्थ  विक्रीस आणणाऱ्या चौघांना एपीएमसी पोलिसांनी केले गजाआड

बारामुल्ल ः जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील जेंटमुल्ला येथील मशिदीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात निवृत्त एसएसपी मोहम्मद शफी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, निवृत्त एसएसपी मशिदीत नमाज अदा करत असतांना दहशतवाद्यांनी मशिदीच्या आत घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर दहशतवादी पळून गेले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. जम्मूमध्ये गेल्या 4 दिवसांतील ही तिसरी मोठी दहशतवादी घटना आहे. यापूर्वी 23 डिसेंबर रोजी अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. 21 डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये पाच जवान शहीद झाले. दोन जवान जखमी झाले आहेत. शनिवारी (23 डिसेंबर) अखनूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर 4 दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी एक दहशतवादी मारला गेला. भारतीय लष्कराच्या व्हाइट नाइट कॉर्प्सने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.

COMMENTS