मुंबई ः सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने दोघांना अटक केली असून आरोपींकडून सुमारे 2400 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची
मुंबई ः सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने दोघांना अटक केली असून आरोपींकडून सुमारे 2400 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. दोन्ही आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकार्याने सांगितले. मोहम्मद फैजली (24) व स्टीफन किशोर (26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. देशान्तर्गत विमान वाहतुकीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने सोमवारी मुंबईतील देशान्तर्गत विमानतळावर सापळा रचला होता. त्यावेळी तामिळनाडूला जाणार्या दोन प्रवाशांवर सीमाशुल्क अधिकार्यांना संशय आला. या संशयावरून त्यांना टर्मिनस 2 येथून ताब्यात घेण्यात आले. तपासणीत त्यांच्याकडे चार पाकिटे सापडली. त्यातील फैजली याच्याकडील पाकिटामध्ये 1280 ग्रॅम सोने सापडले. त्याची किंमत 65 लाख 27 हजार रुपये आहे. याशिवाय किशोरकडे 1288 ग्रॅम सोन्याची भुकटी सापडली. त्याची किंमत 65 लाख 27 हजार रुपये असल्याचे अधिकार्याने सांगितले. दोघांकडून एकूण एक कोटी 30 लाख 55 हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपी परदेशातून सोन्याची तस्करी करणार्या टोळक्याशी संबंधीत असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. हे तस्कर परदेशातून मुंबईत सोने घेऊन येतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळारून देशान्तर्गत विमानतळावर सोने नेण्यात येते. तेथून देशातील इतर ठिकाणी त्याचे वितरण होत असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकार्याने सांगितले.
COMMENTS