Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडा भरतीत आणखी एक गैरप्रकार उघड

अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने नोकरभरतीला गती दिली असून, विविध विभागात नोकरभरती जोमाने होत आहे. मात्र या नोकरभरतीसोबतच बनावट प्रमा

ऑनलाईन शिक्षणामुळे घडली आत्महत्या |
घरीच थांबा, तुम्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’ संभाजीराजेंचं आवाहनl पहा LokNews24
अहमदनगर जिल्ह्यात तरूणाची निर्घृण हत्या  

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने नोकरभरतीला गती दिली असून, विविध विभागात नोकरभरती जोमाने होत आहे. मात्र या नोकरभरतीसोबतच बनावट प्रमाणपत्र विकणार्‍यांचे प्रमाण देखील वाढले आहे. म्हाडाच्या परीक्षेतील तोतया उमेदवार, कॉपी गैरप्रकारानंतर भरतीतील आणखी एक गैरप्रकार उघड झाला आहे. भरतीतील एक यशस्वी उमेदवार अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून सेवेत रुजू झाला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर म्हाडाने या उमेदवाराला सेवेतून बडतर्फ केले असून म्हाडाने उमेदवार आणि त्याच्या साथीदाराविरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
म्हाडाने 565 पद भरतीसाठी घेतलेल्या संगणकीय परीक्षेत मोठा गैरप्रकार झाला आहे. परीक्षेतील गुणवत्ता यादीतील 60 उमेदवार दोषी आढळले असून त्यांच्याविरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याआधी याच भरतीसाठी डिसेंबर 2021 मध्ये होणारी ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पेपर फुटीचा मोठा गैरप्रकार उघड झाला होता. असे असताना आता भरती परीक्षेतील यशस्वी उमेदवाराने अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे. विकास ढोले याने आपण 70 टक्के दृष्टी गमावल्याचे प्रमाणपत्र सादर केले आणि तो वरिष्ठ लिपिक म्हणून सेवेत रुजू झाला. मात्र त्याने सादर केलेल्या प्रमाणपत्राबाबत साशंकता निर्माण झाल्याने त्याची बारकाईने पडताळणी करण्यात आली. तेव्हा हे प्रणामपत्र बनावट असल्याचे उघड झाले. बुलढाण्यातील शासकीय रुग्णालयाकडून असे कोणतेच प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशीअंती याप्रकरणी म्हाडाने नुकताच खेरवाडी पोलिस ठाण्यात ढोले आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान ढोले याला म्हाडाने याआधीच सेवेतून कमी केले आहे.

COMMENTS