Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिक आमच्यासोबत नाही

प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण

मुंबई ः माजीमंत्री, आमदार नवाब मलिक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर अर्थात अजित पवार गटाच्या बाकावर बसल्याने विरोधकांनी जोरदार टीका

कल्याण आधारवाडी परिसरात दुस:याच्या भांडणात लहान भावाची मध्यस्थी मोठया भावाच्या जिवावर बेतली | LOKNews24
डोशातील चटणीला आक्षेप घेतल्याने मारहाण..तिघांना सक्तमजुरी
खा. नीलेश लंकेंनी लोकसभेत घेतली इंग्रजीतून शपथ

मुंबई ः माजीमंत्री, आमदार नवाब मलिक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर अर्थात अजित पवार गटाच्या बाकावर बसल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या भूमिकेचे केलेले समर्थन या सर्व राजकीय घडामोडींनंतर अखेर मलिक प्रकरणावर अजित पवार गटाने थेट भूमिका मांडत नवाब मलिक आमच्यासोबत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवाब मलिक यांच्याशी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळाला आहे. ते काल, गुरुवारी विधानभवनात आले. ते आमचे सहकारी होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. निवडणूक आयोगाकडे आमदारांची यादी दिली आहे, त्यातही आम्ही मलिक यांचे नाव दिलेले नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत. मलिक यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. ते आमचे सहकारी असून, त्यांच्या तब्येतीची माहिती आम्ही घेतली. त्यांचे स्वागत केले, असे पटेल म्हणाले. मुस्लिम समाजाच्या मतांसाठी आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारेचा आहे. त्याच्यामुळे सर्व समाजांसाठी एकत्र येऊन आम्ही प्रश्‍न मांडतो. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर विरोधक हताश झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे आरोप-प्रत्यारोप त्यांच्याकडून केले जात आहेत, असा हल्लाबोलही पटेल यांनी केला. माझ्यावरही आरोप केले जातात. त्याच्यावर शरद पवार यांनी आधीच उत्तर दिले आहे. माझ्यावरील आरोपांवर मी यापूर्वीही स्पष्टीकरण दिलेले आहे, असेही पटेल यांनी सांगितले.

मलिकांना तातडीने आर्थर रोड जेलमध्ये पाठवा ः कंबोज- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटर बॉम्बनंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील आमदार नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांची तब्येत ठिकठाक दिसत असल्यामुळे त्यांना उपचारांची गरज नाही असे कंबोज यांनी म्हटले आहे. कंबोज यांनी एक्सवर एक पोस्ट लिहली आहे. ’मिया नवाब मलिक यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द करावा. उपचारांसाठी जामीन, अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नाही. कचरा सेठची तब्येत ठणठणीत आहे असे पाहून वाटत आहे, त्यांना कोणत्याही उपचारांची गरज वाटत नाही. त्यांनी पुन्हा तातडीने आर्थर रोड जेलमध्ये पाठवावे’, असे कंबोज यांनी म्हटले आहे.

COMMENTS