Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी ?

मुंबई प्रतिनिधी - ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या राजकारणात मागील अनेक दिवसांपासून च

गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 
रेमडेसिव्हिर घोटाळ्यात आदित्य ठाकरे अडचणीत
ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला त्यांचे काय झाले ते महाराष्ट्रात पहा… आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

मुंबई प्रतिनिधी – ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या राजकारणात मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही चौकशी सुरू केली गेली तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्याआधी दिशा सालियान हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी सुशांतसिंह राजपूत त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या सगळ्या प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात होते. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशीची ही मागणी वारंवार केली जात होती. भाजप नेत्यांकडून हे प्रकरण उचलून धरण्यात आले होते.

त्यानंतर आता राज्य सरकारने या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहे. चौकशीत काही माहिती समोर येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS