नाशिक: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने सुरूवातीपासून शेवटच्या अंतरापर्यंतचे परिवहन अधिक कार्यक्षम करण्य
नाशिक: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने सुरूवातीपासून शेवटच्या अंतरापर्यंतचे परिवहन अधिक कार्यक्षम करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेशी बांधील राहत नवीन इन्ट्रा व्ही७०, इन्ट्रा व्ही२० गोल्ड आणि एस एचटी प्लस च्या लाँचची घोषणा केली. ही नवीन वाहने उत्तम उत्पन्नासह लांबच्या अंतरापर्यंत जास्त पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. दर्जात्मक वैशिष्ट्यांनी युक्त ही वाहने विविध उपयोजनांसाठी वापरता येऊ शकतात, ज्यामधून भारतातील शहरी व ग्रामीण भागांमधून उच्च फायदे व उत्पादकता मिळेल. टाटा मोटर्सने त्यांची लोकप्रिय वाहने इन्ट्रा व्ही५० आणि एस डिझेलचे सुधारित व्हर्जन्स देखील लाँच केले, जे मालकीहक्काचा खर्च कमी करण्यासह इंधनाचा वापर कमी करण्यासाठी नव्याने डिझाइन करण्यात आले आहेत. या नवीन लाँचसह टाटा मोटर्स लहान व्यावसायिक वाहने व पिकअप्सची व्यापक श्रेणी देते, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या आवश्यकतांनुसार सर्वात सानुकूल वाहनाची निवड करू शकतात. या वाहनांसाठी बुकिंग्ज देशभरातील सर्व टाटा मोटर्स सीव्ही डिलरशिप्समध्ये सुरू आहेत.या वाहनांना लाँच करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले, ”विविध उपयोजनांसाठी सानुकूल सोल्यूशन्स देण्याव्यतिरिक्त आमची लहान व्यावसायिक वाहने व पिकअप्स उदरनिर्वाह देण्यासाठी आणि ग्राहकांचा जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी ओळखली जातात. आज आम्ही लाँच करत असलेली वाहने विशिष्ट इनपुट्स आणि वापरकर्त्यांच्या मोठ्या समुदायाकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार विकसित करण्यात आली आहेत
COMMENTS