Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोर्चानंतर ‘आळंदी बंद’चा निर्णय अखेर मागे

वारकर्‍यांना वेठीस धरणे योग्य नाही ःराजेंद्र उमाप

आळंदी : ग्रामस्थांनी आळंदी देवस्थानच्या विश्‍वस्त निवडीवरून मंगळवारी ‘आळंदी बंद’ची हाक दिली होती. सकाळी मोर्चा काढून झाल्यानंतर आळंदी बंदचा निर्ण

चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा
संजीवनी अभियांत्रिकीच्या 60 विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड
सर्वपक्षीय बैठकीच आवाहन म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण

आळंदी : ग्रामस्थांनी आळंदी देवस्थानच्या विश्‍वस्त निवडीवरून मंगळवारी ‘आळंदी बंद’ची हाक दिली होती. सकाळी मोर्चा काढून झाल्यानंतर आळंदी बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आळंदी ग्रामस्थ हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. यावर नवनिर्वाचित विश्‍वस्त राजेंद्र उमाप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेच्या काळात वारकर्‍यांना वेठीस धरणे अजिबात योग्य नाही. चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकतो. मुळात त्यांची जी मागणी आहे, ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांनी असे आंदोलन करणे योग्य नसल्याचे विश्‍वस्तांनी म्हटले आहे.

आळंदीच्या देवस्थान विश्‍वस्त पदावर डावलल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी आळंदी बंदची हाक दिली. दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही वेळ ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांनी आळंदी बंदचा निर्णय मागे घेतला आहे. नवनिर्वाचित विश्‍वस्त राजेंद्र उमाप म्हणाले, वारकर्‍यांना वेठीस धरणे अजिबात योग्य नाही. कोणालाच ते आवडलेले नाही. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याची आमची भूमिका आहे. 14 दिवस झाले आम्ही कार्यभार सांभाळत आहोत. त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती तर तोडगा निघाला असता. त्यांनी तसा संवाद साधला नाही. कालही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, आजही पायरी पूजन झाल्यानंतर चर्चेचे आवाहन केले. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या अडचणी या प्रशासनाशी आहेत. पुढे ते म्हणाले, आमची निवड ही पुणे जिल्हा सत्र न्यायाधीशांनी केली आहे. विश्‍वस्त निवडीची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून जायला हवं. त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. खर्‍या अर्थाने आजपासून कार्तिकी यात्रेला सुरुवात होत आहे. आजच्या दिवशी असं टोकाचं पाऊल उचलणं माझ्या दृष्टीने संयुक्तिक नाही. आजच्या दिवशी गावकर्‍यांची दुकाने बंद करणे संयुक्तिक नाही. ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या नक्कीच विचारात घेतल्या जातील. सकारात्मक चर्चा करू, आज ही आम्ही तयार आहोत. चर्चेतून मार्ग निघेल, आमच्या पातळीपर्यंत आम्ही प्रश्‍न सोडवू, आमचा त्यांच्या मागणीला आक्षेप नाही. त्यांची मागणी ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्यांनी असे आंदोलन करणे योग्य नाही, असे विश्‍वस्त राजेंद्र उमाप यांनी म्हटले आहे.

विश्‍वस्त निवडीत डावलल्याने मोर्चा – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान समितीच्या विश्‍वस्तपदी डावलल्याने आळंदीकर ग्रामस्थांनी कार्तिकी यात्रेच्या पहिल्याच दिवशी निषेध मोर्चा काढला. मंदिरासमोर काही काळ ठिय्या मांडला. बंदलाही प्रतिसाद मिळत असून बंदमुळे वारकर्‍यांची गैरसोय होताना दिसत आहे. संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्‍वस्तपदी नुकतीच तीन विश्‍वस्तांची नेमणूक जिल्हा न्यायाधीशांनी जाहीर केली. तत्कालीन तीन विश्‍वस्तांच्या शिफारशीमुळे नवीन तीन विश्‍वस्तांची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिकांनी मंगळवारी बंदचे आवाहन केले होते.

COMMENTS