Homeताज्या बातम्यासंपादकीय

वायूप्रदूषण चिंताजनक  

अलीकडच्या काही महिन्यांपासून भारतात वाढणारे प्रदूषण चिंताजनक आहे. वायूप्रदूषण वाढण्यात हवामानाचा खूपच प्रभाव असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमा

शिदेंच्या शिवसेनेवर नामुष्की
संसदेचा आखाडा
अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस  

अलीकडच्या काही महिन्यांपासून भारतात वाढणारे प्रदूषण चिंताजनक आहे. वायूप्रदूषण वाढण्यात हवामानाचा खूपच प्रभाव असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमान, वातावरणातील वरच्या भागातील तापमान इत्यादी प्रदूषण पसरवण्यात किंवा एकवटण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. गेल्या काही वर्षांपासून राजधानी दिल्ली, मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता चांगलीच खालावली होती. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर देखील परिणाम झाला होता. मात्र भारतासारख्या देशात दरवर्षी वायू प्रदूषणामुळे जवळपास 21 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. भारताच्या उत्तर भागातील मैदानी प्रदेशात सर्वाधिक प्रदूषण होत आहे. या भागात दिल्ली परिसरातील पीएम 2.5 चे प्रमाण हे 2021 साली तब्बल 126.5 मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर एवढे आढळून आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्यामुळे दिल्लीकरांचे सरासरी आयुर्मान हे 11.9 वर्षांनी कमी होण्याची शक्यता आहे. लॅन्सेटने 2022 साली एक अभ्यास केला होता. या अभ्यासानुसार वायुप्रदूषणामुळे भारतात 2019 साली साधारण 16.7 लाखांपेक्षा अधिक अकाली मृत्यू झाले. यातील 9.8 लाख मृत्यू हे पीएम 2.5 मुळे झाले होते; तर 6.1 लाख मृत्यू हे घरगुती वायुप्रदूषणामुळे झाले होते. देशात दरवर्षी प्रदूषणामुळे 2.18 मिलियन म्हणजेच 21 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. वायू प्रदुषणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण चीनमध्ये सर्वाधिक आहे. चीननंतर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाची पातळी जोमाने वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येतांना दिसून येत आहे. मानवी आयुर्मान देखील घटतांना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वीच शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने एक महत्त्वाचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार हवा प्रदूषणामुळे दक्षिण आशियाई देशातील लोकांचे आयुर्मान 5.1 वर्षांनी घटत असल्याचे सांगण्यात आले आहे. खरंतर वायू प्रदूषण धोकादायक आहे. त्याचा घातक परिणाम थेट श्‍वसन संस्थेवर होतो. विविध प्रदूषक घटके श्‍वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड.हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्‍वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर फुफ्फुसे व श्‍वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास सर्दी होते. ही सर्दी अनेक दिवसांची जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते. कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो.  केवळ मनुष्यच नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होतात. सल्फर डायॉक्साईड व नायट्रोजन डायॉक्साईडमुळे अम्लधर्मी पावसाची निर्मिती होते व त्याचे विपरीत परिणाम जमीनीवर व पिकांवर होतो.शेतातील पिक उदा. गहू ज्वारी इतर खराब होतात असे निदर्शनात येत आहे. भारतात गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शास्त्रीय नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या माहितीनुसार शहरातील 10 मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांत 2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांचे प्रमाण 70 टक्यांपेक्षाही जास्त आहे. हे प्रमाण दोन तीन दशकांपूर्वी 5 टक्यांपेक्षाही कमी होते. भारतातील सर्वच मोठी शहरे या प्रदूषणाच्या विळख्यात असून दिल्ली, कानपूर, पुणे, बंगलोर ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मोडतात. सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांची आरोग्यासाठी मर्यादा काही तासांसाठी 50 पीपीएम इतकी आहे.

COMMENTS