गाझा - देव तारी त्याला कोण मारी... असेच एक प्रकरण गाझा येथून समोर आले आहे. जिथे 37 दिवसांपासून ढिगाऱ्याखाली दबलेलं नवजात बाळ जिवंत सापडले.
गाझा – देव तारी त्याला कोण मारी… असेच एक प्रकरण गाझा येथून समोर आले आहे. जिथे 37 दिवसांपासून ढिगाऱ्याखाली दबलेलं नवजात बाळ जिवंत सापडले. या नवजातचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून लोक भावूक होत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामदरम्यान हा व्हिडिओ समोर आला आहे. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी ढिगाऱ्यातून निष्पाप बाळ सापडले होते. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्बफेक करून अनेक इमारती आणि रुग्णालये जमीनदोस्त केली. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये हजारो लोक मारले गेले. सर्वत्र मृतदेहांचे ढीग पडले होते. रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागाच नव्हती, अशी परिस्थिती होती. बहुतेक शहरे उध्वस्त झाली होती. त्यांना ही नवजात मुलगी उद्ध्वस्त घरांमध्ये पुरलेली आढळली. वृत्तानुसार, गाझामध्ये युद्धविराम सुरू असताना सुरक्षा दल इमारतींखाली दबलेले मृतदेह बाहेर काढत असताना एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. घराच्या ढिगाऱ्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. सुमारे 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर जवानांनी ढिगारा हटवला तेव्हा लहान मूल एका मोठ्या दगडाखाली सुखरूप पडलेलं दिसलं. बाळ सुखरूप असल्याचे पाहून बचाव कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 37 दिवसांपासून ढिगाऱ्याखाली बाळ घराचा फरशी तुटलेला असून त्यात 37 दिवसांपासून बाळ खाली असल्यचे चित्र व्हिडिओत दिसत आहे. बाळाला पाहून लोक भावूक झाले. प्रत्येकजण देवाचे आभार मानताना दिसत होता. 37 दिवसांनी बाळाला जिवंत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण आपल्या कड्यावर असलेल्या बाळाचे प्रेम करताना दिसत आहे.7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता, त्यानंतर इस्रायल गाझा पट्टीमध्ये सतत कहर करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे 15,000 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.
COMMENTS