Homeताज्या बातम्यादेश

ओडिशात 8 भाविकांचा अपघातात मृत्यू

केंदूझार ः ओडिशामधून देवदर्शनासाठी निघालेल्या आठ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. केंदुझार जिल्ह्यातील राष्ट्रीय मह

अमृतसरहून माता वैष्णोदेवीला जाणारी बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू
आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोचा झाला अपघात
रात्रीच नंबर लावायला निघाले, काळाने डाव साधला, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

केंदूझार ः ओडिशामधून देवदर्शनासाठी निघालेल्या आठ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. केंदुझार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 20 वर बालीजोडीजवळ आज सकाळी हा भीषण अपघात झाला. पोदामारी गावातील 20 जण व्हॅनमधून जिल्ह्यातील माँ तारिणी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सर्वजण आनंदाने घरातून निघाले होते, मात्र या आनंदाचे रूपांतर क्षणार्धात दुःखात झाले. वेगात असणार्‍या वॅनने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी व्हॅन वेगात होती. सकाळी दाट धुके असल्याने वाहन चालकाला ट्रक दिसला नसावा असा अंदाज आहे. अपघातात जखमी असलेल्या सर्वांना घटगाव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे.

COMMENTS