Homeताज्या बातम्यादेश

सिल्क्यारा बोगदा दुर्घटना ’दैवी कोप’ की निष्काळजीपणा ?

41 कामगारांना 17 दिवसाच्या अंधार कोठडीतून सुटका

उत्तराखंड प्रतिनिधी : गेल्या 18 दिवसापूर्वी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम सुरु असलेल्या सिल्क्यार

फडणवीसांसह अनेकांना अडकवण्याचा ’मविआ’ कट
सरकारने जाणिवपूर्वक मागासवर्गियांचे प्रमोशन थांबवले – हरिभाऊ राठोड 
निवडणुका आणि लोकांचा सहभाग

उत्तराखंड प्रतिनिधी : गेल्या 18 दिवसापूर्वी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम सुरु असलेल्या सिल्क्यारा बोगद्याचा काही भाग भूर्गभात झालेल्या हालचालीमुळे अचानक कोसळला. या घटनेमुळे बोगद्यातील 66 मीटर परिसरात हा राडा पडल्याने बोगद्यातून ये-जा करण्याचा मार्ग बंद झाल्याने 41 कामगार आत अडकले होते. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता जागतिक पातळीवर बोगद्याचे खोदकाम करणार्‍या तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तसेच भारताच्या विविध राज्यातील प्रकल्पांच्या बोगद्याचे तज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या सर्व प्रयत्नांना काही अंशी यश आले. मात्र, बोगद्यात अडकलेले कामगार आहे त्याच ठिकाणी होते. अखेर देवभूमिमध्ये देवाची कृपा म्हणावी त्या प्रमाणे रॅट मायनिंगच्या पर्यायाला नाईलाजाने मान्यता द्यावी लागली. या पथकाच्या प्रयत्नांना मंगळवारी सायंकाळी अखेर यश आले असून कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली.  

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम सुरु असलेल्या सिल्क्यारा बोगद्याचा 17 दिवसापूर्वी काही भाग कोसळल्याने 41 मजुर अडकले होते. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या यंत्रणा पुर्ण क्षमतेने बचावाचे प्रयत्न करत होते. मात्र, सर्व अत्याधुनिक यंत्रणांच्या प्रयत्नांना यश आले नव्हते. अखेर कर्मवीरांच्या मदतील रॅट मायनिंगची 12 जणांची टिमने केलेल्या प्रयत्नाला यश येवू लागले आहे. बचाव कार्यात येणार्‍या प्रत्येक अडथळ्यावर पर्याय काढत एकाच वेळी रॅट मायनिंयगची टिम, बोगद्याच्या वरच्या बाजूने व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यास सुरुवात करण्यात आली होती. तसेच समांतर ड्रिलिंग करण्याचाही प्रयत्न सुरु करण्यात येणार होते.

बोगद्याच्या अगदी वरच्या जंगलात बौख नाग देवतेचे मंदिर आहे. कंपनीने जंगलांना त्रास देत बोगदा बांधण्यास सुरुवात केली आणि त्या बदल्यात कंपनीने बोगद्याजवळ देवतेचे मंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतू सन 2019 पासून अद्याप मंदिर बांधले गेले नाही. याबाबत अनेकदा लोकांनी कंपनीच्या अधिकार्‍यांना आठवण करून दिली. मात्र, अधिकार्‍यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे हा दैवी कोप असल्याचे काही गावकर्‍यांचे म्हणणे आहे. तर या घटनेनंतर घटनास्थळी आलेल्या मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी या बौख नाग देवतेचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता इंटरनॅशनल टनेलिंग एक्सपर्ट अर्नोल्ड डिक्स यांनीही या देवतेचे दर्शन घेतले. तंत्रज्ञानाने हात टेकल्यानंतर अखेर अध्यात्मिक आविष्काराचा करिष्मा पहावयास मिळाला. उत्तरकाशीची देवभूमि म्हणून ओळख आहे. हा दैवी कोप असल्याचे काही गावकर्‍यांचे म्हणणे आहे.

एनएचआयडीसीएलचे संचालक डॉ अंशू मनीष खालको यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बोगद्याच्या आतील मशिनच्या कंपनामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. जेणेकरून पुढील ढिगारा खाली पडू नये. मशीनला थोडा वेळा बंद ठेवण्याच्या उद्देशाने कामही बंद करण्यात आले आहे. आता सर्व बाजूंनी पराभव स्वीकारत रॅट मायनर्संनी हाताने खोदकाम सुरू केले आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता केवळ काही मीटर खोदाई करावी लागणार आहे. तत्पूर्वी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि परदेशातून आलेले आंतरराष्ट्रीय टनेलिंग तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी बाबा बौखनागची पूजा केली. सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिक देवतेच्या तात्पुरत्या मंदिराबाहेर पूजा करण्यात आली. ग्रामस्थांच्या आरोपानंतर आठवडाभरापूर्वीच मंदिर बांधण्यात आले. बोगद्याच्या बांधकामादरम्यान मंदिर हटवण्यात आले होते.

कामगारांना अत्यावस्थ सुविधा देण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बोगद्याच्या आतच वैद्यकिय पथकाने छोटेखानी रुग्णालय बनले आहे. तेथे कामगारांच्या नातेवाईकांना नेण्यात आले आहे. तर कोरोना काळातील बंद असलेले रुग्णालयही तात्पुरत्या स्वरुपात तयार ठेवण्यात आले आहे. तात्पुरत्या रुग्णालयापर्यंत कामगारांना पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका तसेच एअर अ‍ॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी कामगारांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे. रात्री उशिरा हे बचाव कार्याला यश येण्यास प्रारंभ झाला. रॅट मायनिंगच्या पथकाने केलेल्या कामाची पोचपावती म्हणून गेल्या 17 दिवसापासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याच्या कामास प्रारंभ झाला. त्यावेळी  

बचावाच्या पहिल्या दिवसापासून अपयश :-

प्लॅन ए- जेसीबी मशीन आणि पोकलेनच्या साहाय्याने बोगदा खोदण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो प्रयत्न फसला.

प्लॅन बी- सॉफ्ट कटिंग मशीन ऑर्डर केले जे तांत्रिक बिघाडामुळे काम करू शकले नाही.

प्लॅन सी- आणखी एक नवीन ’ऑगर ड्रिलिंग मशीन’ चिन्यालिसौर हवाई पट्टीवर ’वायुसेना’ जहाजांमधून एअर लिफ्ट करण्यात आले, परंतु ते देखील अयशस्वी झाले.

प्लॅन डी- आता रेस्क्यू टीम रॅट होल मायनिंगचा अवलंब करत आहेत. रॅट होल मायनिंग करणार्‍या संघांनी ऑगर मशीन जिथे बंद झाले तेथून मॅन्युअल ड्रिलिंग सुरू केले आहे.

प्लॅन ई- बोगद्याच्या वरील बाजून व्हर्टिकल ड्रिलिंग देखील केले जात आहे. त्यात 1 मीटर रुंद पाईप टाकण्यात येत आहे. याच्या मदतीने कामगारांना वर खेचले जाईल.

त्याचबरोबर जर आपण सिध्दपीठ धरी देवीबद्दल बोललो, तर या मंदिराला देखील खूप प्रामाणिक इतिहास आहे. हे मंदिर श्रीनगर गढवालपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर अलकनंदा नदीच्या काठावर वसले होते. श्रीनगर जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीनंतर हा परिसर पाण्याखाली येत होता.

त्यासाठी प्रकल्प चालविणार्‍या कंपनीकडून त्याच ठिकाणी खांब उभारून मंदिराचे बांधकाम करण्यात येत होते. मात्र, जून 2013 मध्ये केदारनाथ महापुरामुळे अलकनंदा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मूर्ती (धारी देवी, भैरवनाथ आणि नंदी) नष्ट करण्यात आले. त्याचे उत्थान करण्यात आले. नऊ वर्षांपासून या तात्पुरत्या जागेत मूर्ती बसल्या आहेत. असे मानले जाते की जलविद्युत प्रकल्पासाठी अलकनंदावर धरण बांधले जात होते. येथे श्रीनगरपासून 14 किमी अंतरावर असलेले सिध्दपीठ धारी देवीचे मंदिर जलमग्न क्षेत्राखाली येत होते. प्रकल्प कंपनीने धरणी देवी मंदिरापासून मूर्तीचे उत्थान करण्याचा निर्णय घेतला.

गढवालच्या लोकांनी याचा निषेध केला आणि त्याला विनाशकारी म्हटले. परंतू कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्यांचे ऐकले नाही आणि 16 जून 2013 रोजी धारी देवीच्या मूर्तीचे उत्थान करण्यात आले. त्याच दिवशी केदारनाथमध्ये पूर येवून शेकडो लोकांचा मृत्यू झाला. गढवालचे लोक या विनाशकारी आपत्तीसाठी प्रकल्प कंपनीला जबाबदार धरतात आणि पूर हा धारी देवीचा कोप मानला जातो. याचा पुरावा तत्कालीन खा. सुषमा स्वराज यांनी सभागृहातील भाषणात दिला आहे.

COMMENTS