Homeताज्या बातम्यादेश

नवीन वर्षात फोन-पे देणार पर्सनल लोन

नवी दिल्ली / प्रतिनिधी : डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे वर लवकरच पर्सनल लोन उपलब्ध करुन देणार आहे. फोन पे वापरकर्ते आता त्यांच्या फोन पे या अ‍ॅपवरून

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपांना 8 तास सुरळीत वीजपुरवठा
चावी शिवाय स्टार्ट होणार स्कूटर
मॉड्युलर बेडचे नागरिकांनी व्यवस्थित वापर करावा : राहुल महाडीक

नवी दिल्ली / प्रतिनिधी : डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे वर लवकरच पर्सनल लोन उपलब्ध करुन देणार आहे. फोन पे वापरकर्ते आता त्यांच्या फोन पे या अ‍ॅपवरून सहजपणे पर्सनल लोन घेऊ शकतील. अहवालानुसार, फोन पे पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2024 पर्यंत आपल्या प्लॅटफॉर्मवर ग्राहक कर्ज लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

फोन पे कंपनीने डिजिटल पेमेंट क्षेत्रात चांगली पकड निर्माण केली आहे, कंपनी आता नवीन क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पाच बँका आणि एनबीएफसीने फोन पे प्लॅटफॉर्मवर येण्यास सहमती दर्शवली आहे. लवकरच कंपनी याबाबत घोषणा करणार आहे. जवळपास 6 महिन्यांत फोनपे अ‍ॅपवर अनेक प्रकारची उत्पादने लोकांना उपलब्ध करून दिली जातील. सध्या कंपनी आपल्या ग्राहक डेटाबेसमधून अशा लोकांचा शोध घेत आहे जे विविध प्रकारच्या कर्जासाठी पात्र आहेत. हळूहळू कंपनी त्यांना ऑफर पाठवायला सुरुवात करेल.

फोनपे कंपनीने 50 कोटींहून अधिक ग्राहकांना विमा पॉलिसी विकली आहे. कंपनीने आधीच आपल्या प्लॅटफॉर्मवर विमा सेवा सुरू केली आहे. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर जीवन, आरोग्य, मोटार आणि कार विमा उपलब्ध आहेत. यासाठी फोनपेने एसीकेओसह अनेक कंपन्यांशी करार केला आहे. फोनपेद्वारे विमा घेतल्यावर ग्राहक ईएमआयद्वारे देखील पेमेंट करू शकतात. या वर्षी जुलैपर्यंत कंपनीने 56 लाख पॉलिसी विकल्या आहेत. कंपनीने नुकताच 50 कोटी ग्राहकांचा आकडा पार केला आहे. याशिवाय, फोनपे प्लॅटफॉर्मवर सुमारे 3.7 कोटी व्यापारी आहेत. अलीकडेच कंपनीने क्रेडिट कार्ड सेवा सुरू करण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेशीही चर्चा केली होती. ही सेवाही लवकरच सुरू होणार आहे.

सरकारी व खाजगी बँकांना हजारो कोटीचा गंडा घालणार्‍यांची मोठी यादीच आपल्या देशात बनलेली पहायला मिळत आहे. अशा स्थितीत फोनपे घेत असलेला निर्णय ग्राहकांना बुचकाळ्यात टाकणारा वाटत आहे. फोन पे हे एक मोबाईल अ‍ॅप्लीकेशन जर इतका मोठा निर्णय घेत असेल तर भारतात कर्ज घेणार्‍या लोकांची मोठी संख्या असल्याचे दिसून येत आहे. मग सरकारी तथा व्यावसायिक बँकांच्या कामकाजावर याचा काय करतात. रिझर्व्ह बँकेने कर्ज वाटप करणार्‍या बँकांना घातलेली मर्यादा फोन पे पाळणार की त्यांची स्वत:ची वेगळी नियमावली असणार आहे. याबाबत मात्र, काहीही माहिती सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे फोन पे पाठोपाठ आता आनखी कोणते अ‍ॅप्लिकेशन आपल्या ग्राहकांसाठी वेगळी सुविधा देणार की आहे त्यावरच समाधान मानायला लावणार?

COMMENTS