Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाल सुधारगृहातील अल्पवयीन मुलावर अत्याचार

पुणे: येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा

राज्य सरकारकडून लॉजिस्टिक धोरणाला मंजूरी
जयंत प्रिमियर कबड्डी लिग’च्या दुसर्‍या दिवशी जय हनुमान पतसंस्था टायगर्स हा संघ डॉर्क हॉर्स ठरला
दूधाला किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार : मंत्री सुनिल केदार

पुणे: येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार तीन मुलांविरुद्ध अनैसर्गिक कृत्य करणे, मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी परिसरात झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने आरोपी मुलांना येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पीडित मुलाला एका गुन्ह्यात बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. बराक क्रमांक दोनच्या परिसरात आरोपी मुलांनी पीडित मुलाला मारहाण करुन त्याला कपडे धुण्यास सांगितले. मुलाने नकार दिल्यानंतर त्यांच्या तोंडात साबण घालून त्याला कपडे धुण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी मुलांनी मध्यरात्री झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मुलाला त्रास झाल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेली आरोपी मुले अठरा वर्षांची आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात येणार असून, याबाबत न्यायालयाला पत्र देण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी मुलांना अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे यांनी सांगितले.

COMMENTS