Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी नेते व साखर कारखानदारांतील ऊस दराची बैठक वादळी

बैठकीमध्ये ऊस दराबाबत कोणताही निर्णय नाही

शेवगाव - शेवगाव तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी पाथर्डीचे प्रांत अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी नेते व साखर कारखानदार यांच्यातील

आता कोणीही लॉकडाऊन अजिबात पाळणार नाहीत…
निळवंडे कालव्यांना गती देवून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवा : ना. आशुतोष काळे
आई ज्याला कळली तो खरा भाग्यवान ः डॉ. बाबुराव उपाध्ये

शेवगाव – शेवगाव तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी पाथर्डीचे प्रांत अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी नेते व साखर कारखानदार यांच्यातील ऊस दराची बैठक वादळी झाली. मात्र बैठकीमध्ये ऊस दराबाबत कोणताही निर्णय झाला नाही. यावेळी बैठक संपल्यानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी साखर कारखानदारांचा जाहीर निषेध व्यक्त केला व मोठी घोषणाबाजी केली.

शेवगाव तालुका शेतकरी संघटने कडून गेल्या दोन महिन्यांपासून ऊस दरबाबत विविध मागण्यांचे निवेदन साखर प्रशासन व शेवगाव तहसीलदार यांना देण्यात आली होती. वेळोवेळी यावर शेवगाव तहसीलदार यांनी बैठकाही आयोजित केल्या. शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात मागील गळीत हंगामातील 300 रुपये व चालू वर्षीच्या गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन 3100 रुपये पहिला हप्ता  मिळावा. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेले दोन महिने प्रशासन व साखर कारखानदार यांच्याकडे पाठपुरावा केला. 15 नोव्हेंबर रोजी शेवगाव पैठण रोडवर घोटण येथे गंगामाई फाट्यावर शेतकरी संघटने कडून ऊस वाहतूक रोखून आंदोलन करण्यात आले होते. परंतु यावेळी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी मध्यस्थी करून आज 21 नोव्हेंबर रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दराबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु आज झालेल्या बैठकीला साखर कारखानदारांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. व 2700 रुपये प्रति टन ऊस दरावर साखर कारखानदार ठाम राहिले. त्यामुळे आज तहसील कार्यालयामध्ये झालेली बैठक ही वादळी ठरली या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी साखर कारखानदारांचा तसेच शेवगाव पाथर्डी चे लोकप्रतिनिधी यांचाही निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे म्हणाले की सर्व साखर कारखानदार यांचा अंतर्गत संगनमत होऊन 2000 रुपये दर हा अंतिम टप्प्यात जाहीर करण्यात आला. असा आरोप लवांडे यांनी केला. यावेळी शेवगाव पातळीचे प्रांत अधिकारी प्रसाद मते, शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश कचरे, मच्छिंद्र आर्लें, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, तालुका अध्यक्ष अशोक भोसले, शेवगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बबर्रू वडघणे, शेवगाव तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामजी शिदोरे, स्वाभिमान तालुका पक्ष अध्यक्ष प्रशांत भराट, बाळासाहेब गर्जे, शहराध्यक्ष अमोल देवढे युवक अध्यक्ष हरिभाऊ कबाडी, दादासाहेब पाचरणे, विकास साबळे, शिवाजी साबळे, घोटण सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण टाकळकर, माजी सरपंच संजय टाकळकर, रामेश्‍वर शेळके, माजी उपसरपंच अनिल शेळके, माजी चेअरमन संजय अण्णा टाकळकर, नानासाहेब कातकडे,  नारायण पायघन, अंबादास भागवत, शेळके सचिन शेळके, बाळासाहेब क्षीरसागर, बबनराव खेडकर,  नितीन देवढे, भारत मोटकर, कल्याण मोटकर तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते. तसेच कारखानदारांकडून साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दक्षिणेतील साखर कारखान्याबरोबर उत्तरेतील साखर कारखान्यांनी ऊसाला दर द्यावा – अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडील साखर कारखाने हे 3100 रुपये दर देऊन दक्षिण भागातील उस घेऊन जात आहेत, उत्तरेतील साखर कारखान्यांना ऊस दर देण्यात परवडते परंतु दक्षिणेतील साखर कारखान्यांना 3100 रूपये दर देण्यास परवडत नाही. तसेच जे कारखाने फक्त साखर गाळप करतात व जे कारखाने उपपदार्थ तयार करतात यांचा एकच दर (2700)कसा? असा प्रश्‍न शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मेजर अशोक भोसले यांनी उपस्थित केला.

COMMENTS