Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरातील नगरपरिषद,तहसिल कार्यालय,राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्यासाठी वंचितचा प्रांत कार्यालयात बैठा सत्याग्रह

पाथर्डी प्रतिनिधी - शहरातील नगरपरिषद,तहसिल कार्यालय,राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्यात यावे यासाठी वंचितचे प्रा.किसन चव्हाण य

पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी – दीपक महाराज देशमुख
 गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस इंटरक्टिव पॅनल भेट
चापडगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

पाथर्डी प्रतिनिधी – शहरातील नगरपरिषद,तहसिल कार्यालय,राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्यात यावे यासाठी वंचितचे प्रा.किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी माळीबाभूळगाव येथील प्रांत कार्यालयाच्या आवारात सोमवारी सकाळी बैठा सत्याग्रहाला सुरवात केली असून याबाबत त्यांनी प्रांत कार्यालयास शुक्रवारी निवेदन देत सत्याग्रहाचा इशारा दिला होता.दरम्यान जोपर्यंत धनदांडग्याची अतिक्रमण काढून आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बैठा सत्याग्रह थांबणार नसल्याची भूमिका वंचितच्या वतीने घेण्यात आली आहे.

यावेळी अरविंद सोनटक्के,रविद्र म्हस्के,संजय कांबळे,आकाश दौडे,नंदकुमार कांबळे,विनायक चौधरी,सोपान भिंगारे,सुनिल जाधव,हनुमान पवार,सुरेश जाधव,सुनिता जाधव,किशन फतपुरे,अमोल जाध,रोहिनी ठोबे,सुरेश हुलजुते आदीजण सत्याग्रह ठिकाणी उपस्थित होते.

   त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की,पाथर्डी नगरपरिषदेच्या हद्दीतील,तहसिलदार यांचे हद्दीतील व महामार्ग क्र. ६१ च्या हद्दीतील अतिक्रमण आहेत.पण या अतिक्रमणांवर कारवाई करण्याऐवजी भाजीपाला, फळ विक्रेते, व पाथारी वाले यांनाच वर्षानुवर्षे नोटीसा देऊन त्यांचे अतिक्रमणे हटविण्यात येतात.राजकिय पुढा-यांची, धनदांडग्यांची पक्की अतिक्रमणे काढली जात नाहीत.हातावर पोट असणा-यांची अतिक्रमणे पोलिसी बळाचा राक्षसी वापर करून अतिक्रमणे काढली जातात.व धनदांडग्यांची तशीच ठेवली जातात हि शोकांतीका आहे.

            यावेळी अरविंद सोनटक्के यांनी बोलताना म्हटले की,गेल्या सहा वर्षांपासून आपण प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा करत असून कोणीही दखल घेत नाही.शहरात धनदांडग्या लोकांनी चार पाच वर्षात नगरपालिकेच्या हद्दीत आणि सरकारी भूखंडावर मोठ्या प्रमाणावर तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अतिक्रमणे केली आहेत.तहसिलच्या आवारातही गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली.यासंबंधी जिल्हाधिकारी,प्रांत अधिकारी,तहसिलदार यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केले.परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल अतिक्रमणाबाबत घेण्यात आली नाही.सरकारी जागा वाचावी म्हणून आम्ही चार पाच वर्षांपासून झगडत आहोत.जोपर्यंत धनदांडग्याची अतिक्रमण काढून आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही अशी भूमिका आमची असणार असल्याचे मत व्यक्त केले.

चौकट:- सकाळपासून प्रांत अधिकारी कार्यालयाच्या आवारात सत्याग्रहासाठी बसलेल्या वंचितच्या पदाधिकाऱ्याशी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी फोनद्वारे संपर्क साधत सत्याग्रह करू नये अशी मागणी वगळता दिवसभरात चर्चा करण्यासाठी प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नसल्याची माहिती सोनटक्के यांनी दिली.

COMMENTS