Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात

मुंबई : संपूर्ण मुंबईत आज सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर असे तेरा दिवस ही प

स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाला यश आंदोलन केलेल्या स्थळी दहा मिनिटात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन बुजविले खड्डे
हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी
सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्या !

मुंबई : संपूर्ण मुंबईत आज सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर असे तेरा दिवस ही पाणी कपात असेल. त्यामुळे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणार्‍या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मुंबई महापालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तातडीच्या दुरुस्ती कामामुळे 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणार्‍या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई महानगरातील सर्व विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केली आहे.

COMMENTS